breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

सरकारकडून चित्रपट आणि मालिका चित्रिकरणाला परवानगी,पण सरकारकडून मार्गदर्शक सूचना जाहीर

सरकारकडून चित्रपट आणि मालिका चित्रिकरणाला परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्याबाबत सरकारने काही कडक निय़म आणि सुचनाही लागू केल्या आहेत…

१. चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओ टी टी यांना ३० मे २०२० च्या शासन निर्णयानुसार चित्रीकरणासाठी परवानगी देण्यात आली आहे. सदर चित्रीकरणाची परवानगी राज्य शासनाने तयार करून दिलेल्या एसओपी नुसार असणार आहे…लॉकडाऊन पूर्वी ज्या पद्धतीने आरक्षण आणि चित्रीकरणाची परवानगी घेण्यात येत होती, तीच पद्धत आताही असणार आहे…

२. . चित्रीकरण करत असताना संबंधित निर्मात्याने आवश्यक त्या परवानग्या, स्व-घोषित पत्र, चित्रीकणासंबंधित सर्व माहिती चित्रनगरीला लिखित स्वरूपात कळविणे आवश्यक आहे.

३. प्रतिबंधित क्षेत्र नसलेला भाग आणि निषिद्ध क्षेत्र नसलेला भाग यामध्येच चित्रीकरणाला परवानगी आहे. केंद्र शासन व राज्य शासन यांनी लॉकडाउन बाबत दिलेल्या निर्णयाचे पालन करणे आवश्यक राहील.

४. मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी ही पूर्णपणे संबंधित निर्मिती संस्था/ निर्माते यांची असेल. चित्रीकरणादरम्यान सुरक्षेचे व स्वच्छतेचे नियम पाळले जात आहे की, नाही याची खातरजमा वेळोवेळी परवाना अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येईल.

५. चित्रीकरणादरम्यान कलाकार, तंत्रज्ञ सामाजिक अंतर ठेवूनच चित्रीकरण करू शकतात,संबंधित निर्मात्यांनी कमीत कमी मनुष्यबळात चित्रीकरण करणे आवश्यक आहे. संबंधित निर्मात्यांनी केंद्र व राज्य शासनाचे लॉकडाऊन संदर्भातील नियम पाळणे बंधनकारक आहे.

६. थर्मल स्क्रिनिंग, स्वच्छतेची काळजी चित्रिकरणाच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. चित्रीकरणाच्या ठिकाणापासून जवळ असणाऱ्या कोरोना रुग्णालयाची माहिती, तसेच दूरध्वनी क्रमांक निर्मिती संस्थेकडे असणे आवश्यक आहे. तसेच निर्मिती संस्थेने एक स्वतंत्र वाहन आरक्षित करून ठेवणे आवश्यक आहे, जेणे करून जर एखादा संशयित रुग्ण चित्रीकरणाच्या ठिकाणी आढळल्यास त्याला रुग्णालयात नेणे सोयीस्कर होईल. तसेच या वाहनात प्रथमोपचार पेटी, पल्स ऑक्सिमीटर, ब्लड प्रेशर मॉनिटर, शुगर टेस्टिंग किट असणे आवश्यक आहे.

७. राज्य शासनामार्फत जारी करण्यात आलेल्या या मार्गदर्शक सूचना या कलाकार/ तंत्रज्ञ/ मदतनीस यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून करण्यात आले आहे.

८. चित्रिकरण स्टुडिओ आणि एडिटिंग कक्षात करोना विषाणूचा धोका टाळण्यासाठी पुरेशा उपाययोजना करणे, सर्व संबंधितांना, कर्मचाऱ्यांचे करोना विषाणूच्या संदर्भात प्रबोधन करून दक्षता घेण्याच्या सूचना देणे, चित्रीकरणस्थळी गर्दी टाळणे, कमीत कमी तंत्रज्ञांमध्ये चित्रिकरण स्टुडिओ आणि एडिटिंग कक्षात करोना विषाणूचा धोका टाळण्यासाठी पुरेशा उपाययोजना करणे, सर्व संबंधितांना, कर्मचाऱ्यांचे करोना विषाणूच्या संदर्भात प्रबोधन करून दक्षता घेण्याच्या सूचना देणे, चित्रीकरणस्थळी गर्दी टाळणे, कमीत कमी तंत्रज्ञांमध्ये काम करणे, मोबाईलमध्ये आरोग्य सेतू ॲप इन्स्टॉल करणे, साधनसामुग्रीची हाताळणी, चित्रीकरणाच्यावेळी करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, कार्यालयांचे, चित्रिकरण स्थळांचे सॅनिटायझेशन आदी बाबींवर भर देण्याच्या अटी-शर्ती टाकण्यात आल्या असून या अटी शर्तींचे, शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वे, निर्बंधांचे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पालन करणे गरजेचे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button