breaking-newsमहाराष्ट्र

चायनीज मांज्यामुळं कोल्हापूरची तरुणी गंभीर जखमी; चेहऱ्याला पडले १२ टाके

कोल्हापूर– पतंग उडवण्यासाठी वापरात येत असलेला चायनीज मांजा वाहनधारकांच्या जीवावर बेतत आहे. दोनच दिवसांपूर्वी पुणे इथल्या एका महिला डॉक्टरचा चायनीज मांजामुळे जीव गेल्याच प्रकरण ताजं असतानाच कोल्हापुरातील ही एका तरुणीला याचा फटका बसला आहे. या चायनीज मांजामुळे ऐश्वर्या निंबाळकर या तरुणीच्या डोळ्यांना आणि मस्तकाला मोठी इजा झाली असून तिला बारा टाके पडले आहेत.
ऐश्वर्या आपल्या आईसोबत रंकाळा परिसरातील देवकर पाणंद इथं राहणाऱ्या आजीकडे आपल्या दुचाकीवरून जात होती . देवकर पाणंद परिसरात ऐश्वर्या येतात ऐश्वर्याच्या डोळ्यासमोर अचानक एक माज्या डोरा आला आणि काही कळायच्या अगोदर तो दोरा तिच्या डोळ्यांना तटला हा दोरा काही क्षणातच ऐश्वर्याच्या डोळ्या शेजारील भागात घुसून त्या ठिकाणाहून रक्तस्त्राव सुरू झाला. अचानक काय झालं हे कळायला काहीच मार्ग नव्हता पण रक्तबंबाळ झालेल्या ऐश्वर्याला पाहून काही लोकांनी ताबडतोब  शिवाजी पेठेतील कामात हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले . यावेळी ऐश्वर्याच्या नाकाजवळ आणि डोळ्यासमोर घुसलेला दोरा डॉक्टरनी काढला. पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणारा चायनीज मांजा दोरा ऐश्वर्याच्या डोळ्यांच्या शेजारी गंभीर रित्या घुसून तिला मोठ्या जखमा झाल्या आहेत . डॉक्टर आनंद कामत यांनी ताबडतोब ऐश्वर्यावर उपचार करून तिला बारा टाके घातलेत . केवळ नशीब बलवत्तर म्हणून ऐश्वर्या यातून बचावली.
कमी पैशांत न तुटणाऱ्या चायनीज मांजाची सध्या क्रेझ आहे. तो पतंग उडवणाऱ्यांना आनंद देत असला तरी तो वाहनधारकांसाठी जीवघेणा ठरत आहे. कमी जाडीचा मांजा डोळ्याला दिसत नाही. परिणामी मुख्य रस्त्यावरून जाताना वाहनधारक मांजा कापून ते जखमी होत आहेत. त्यामुळे पतंग उडवताना नागरिकांनी याविषयी विशेष काळजी घेणे महत्त्वाचा आहे
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button