breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

करदत्यांना दिलासा, परतावा भरण्याच्या मुदतीत वाढ…

नवी दिल्ली | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयकर भरण्याच्या मुदतीत आणखी एक महिन्याची वाढ करण्यात आली आहे. यानूसार आर्थिक वर्ष 201८-19 साठी आयकर भरण्याची नवी मुदत 31 जुलै 2020 करण्यात आली आहे. तसंच आर्थिक वर्ष 2019-20 साठी आयकर भरण्याची मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. याची घोषणा बुधवारी केंद्र सरकारने केली. आर्थिक वर्ष 2018-19 साठी व सुधारित आयकर विविरणपत्र भरण्याची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. यासह आर्थिक वर्ष 2019-20 साठी प्राप्तीकर परताव्याची मुदत 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

1 लाखापर्यंतचा सेल्फ असेसमेंट टॅक्स भरण्याची मुदत देखील 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र सेल्फ असेसमेंट टॅक्सची रक्कम 1 लाखापेक्षा अधिक असल्यास करदात्यांमा मुदत वाढ मिळणार नसल्याचं आयकर विभागाने स्पष्ट केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button