breaking-newsताज्या घडामोडी

अमित ठाकरेंच्या नेतृत्वात थाळीनाद आंदोलन, महापालिकेत काय घडलं?

मुंबई : एकीकडे महाराष्ट्रात नव्या सरकारची नांदी होत आहे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. त्याचवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी नवी मुंबई महापालिकेविरोधात थाळीनाद आंदोलन पुकारलं होतं. या आंदोलनाला यश आल्याचं चित्र असून महापालिकेकडून त्यांना लेखी आश्वासन देण्यात आलं आहे.

अमित ठाकरेंच्या नेतृत्वात कामगारांनी नवी मुंबई महापालिकेवर आंदोलन पुकारलं होतं. त्यानंतर, तीन आठवड्यात कामगारांचं 14 महिन्यांचं थकीत वेतन देण्याचं लेखी आश्वासन पालिकेकडून देण्यात आलं आहे. फेब्रुवारी 2015 ते एप्रिल 2016 या कालावधीतील कंत्राटी कामगारांचं 14 महिन्यांचा फरक अदा करण्याच्या ठरावाला सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे.

येत्या तीन आठवड्यात थकीत वेतन देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबतही कंत्राटदाराला निर्देश देण्यात आले आहेत. सीवूड स्टेशन ते नवी मुंबई महापालिका या मार्गावर अमित ठाकरेंच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता.

MNS Adhikrut✔@mnsadhikrut

श्री. अमित ठाकरेंच्या नेतृत्वात कामगारांनी पुकारलेल्या आंदोलनाला यश… ३ आठवड्यात कामगारांचं १४ महिन्यांचं थकीत वेतन मिळणार. महापालिका आयुक्तांचं लेखी आश्वासन. #थाळीनाद_महामोर्चा #कामगारांचीमनसे #अमितठाकरे #AmitThackeray https://twitter.com/mnsadhikrut/status/1199340581098409984 …

View image on Twitter
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button