breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

वरुण-साराच्या ‘कुली नं. १’चं पहिलं गाणं चाहत्यांच्या भेटीला

मुंबई – बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री सारा अली खान यांच्या ‘कुली नं. १’ या बहुप्रतीक्षित चित्रपटातील पहिलं गाणं नेटकऱ्यांच्या भेटीला आलं आहे. या चित्रपटातील ‘तेरी भाभी’ हे गाणं प्रदर्शित झालंय. या गाण्यातील वरुण आणि साराच्या डान्सला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. जावेद-मोहसिन, देव नेगी आणि नेहा कक्कडच्या आवाजातील हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होतंय. विशेष म्हणजे या गाण्याचे बोल असे आहेत की कोणालाही थिरलायला लावतील. दानिश साबरी यांनी हे बोल लिहिले आहेत.

वरुण धवन आणि सारा अली खानचा ‘कुली नं. 1’ हा चित्रपट ख्रिसमसच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाचे दिग्दर्शन डेव्हिड धवन यांनी केले असून निर्मिती वाशु भगनानी, जॅकी भगनानी आणि दीपशिखा देशमुख यांनी केली आहे. या चित्रपटात परेश रावल, राजपाल यादव, जावेद जाफरी अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे हा चित्रपट १९९५ साली प्रदर्शित झालेल्या गोविंदा आणि करिश्मा कपूरच्या सुपरडुपर हिट ‘कुली नं. १’ चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटातील गाणी आजही सुप्रसिद्ध आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button