breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

‘नाइट लाइफ’ मुळे महिलांवरील अत्याचार वाढून निर्भयासारख्या हजारो घटना घडतील- भाजप नेते राज पुरोहित

मुंबई | महाईन्यूज |

शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ‘नाइट लाइफ’च्या प्रस्तावाला भाजप नेते राज पुरोहित यांनी विरोध दर्शवला आहे. मुंबईत २४ तास मॉल, रेस्तारंट आणि पब खुले राहिले तर त्यामुळं मद्यसंस्कृती वाढेल आणि त्यामुळं महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होईल. निर्भयासारख्या हजारो घटना उघडकीस येतील. त्यामुळं अशी संस्कृती भारतासाठी चांगली ठरेल का याचा त्यांनी विचार करायला हवा, असं भाजप नेते राज पुरोहित यांनी त्यांच मत व्यक्त केलं आहे.

मुंबईत नाइट लाइफ सुरू करणार, असे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले असले तरी, त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी असमर्थता व्यक्त केली होती. ‘मुंबईत नाइट लाइफ सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या बंदोबस्ताबाबत पोलिसांनी अद्याप तयारी केलेली नाही. त्यामुळे येत्या २६ जानेवारीपासून नाइट लाइफचा प्रारंभ अशक्य आहे’, असं देशमुख यांनी स्पष्ट केलं होतं. आता या नाइट लाइफच्या प्रस्तावावर भाजप नेते राज पुरोहित यांनी वक्तव्य केलं आहे. मुंबईतील नाइट लाइफ तरुणांना चुकीच्या मार्गावर घेऊन जाईल. त्यामुळं बलात्काराच्या घटना वाढतील. गेल्या पाच वर्षांपासून आम्ही नाइट लाइफला विरोध करत आहोत. महिलांवरील अत्याचारात वाढ होईल. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची संख्या तितकी नाही, अशी भीती पुरोहित यांनी व्यक्त केली.

दरम्यान, या प्रस्तावाला मुंबई भाजपनंही विरोध केला होता. नाइट लाइफमुळं मुंबईकरांची शांतता भंग होईल, असं भाजप नेते आशिष शेलार म्हणाले होते. ‘निवासी भागात लेडीज बार, पब चोवीस तास सुरू ठेवण्यास भाजपचा विरोध राहील’, असं त्यांनी सांगितलं होतं. दुसरीकडे नाइट लाइफच्या संकल्पनेचे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी समर्थन केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button