breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सत्यता पडताळणी केल्याशिवाय गुन्हा दाखल करु नये

  • लोकशाही संस्थेची पोलिस आयुक्तांकडे मागणी

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत समाविष्ट 15 पोलिस स्टेशन, विभागातील गुन्हे शाखा, पोलिस चाैकी या ठिकाणचे सहायक पोलिस आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक गुन्हे, पोलिस निरीक्षक, ठाणे अमंलदार यांना गुन्ह्याची सत्यता पडताळणी  केल्याशिवाय गुन्हा दाखल करु नये, याबाबत योग्य कायदेशीर सुचना देवून प्रभावी अमंलबजावणी करावी, अशी मागणी लोकशाही संस्थेकडून करण्यात आली.

याबाबत पोलिस आयुक्त आर.के. पद्यनाभन यांना पत्र दिले आहे. त्या पत्रात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील गुन्हेगारावर नियंत्रण मिळविण्यासाठी कामकाज योग्य पध्दतीने सुरु आहे. परंतू, काही अपरिहार्य गोष्टीमुळे पोलिस प्रशासनातील जबाबदार प्रमुख अधिकारी व कर्मचारी यांनी नजरचुकीने दक्षता न घेतल्याने अनेकांवर चुकीचे गुन्हे दाखल होवू लागले आहेत.

अनेकदा पडताळणी न केल्याने गैरसमजातून फिर्यादीच्या सांगण्यावरुन तथ्य नसलेले खोट्या स्वरुपाचे गुन्हे व तक्रारी यापुर्वी नोद होत आहेत. यात पोलिस प्रशासन पुर्ण दोषी नसले तरीही पडताळणी व नाहक निर्दोष चुक नसलेल्या महिला व पुरुषावर चुकीचे खोटा गुन्हा दाखस होत आहे. अनेकांना गंभीर गुन्ह्यामुळे सामाजिक प्रतिष्ठा धुळीस मिळत आहे.

सदरील खोटे गुन्हे आटोक्यात आणण्यासाठी कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी सर्व जबाबदार पोलिस अधिकारी यांना योग्य कायदेशीर सुचना देवून त्याची प्रभावी अमंलबजावणी होण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करुन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी लोकशाही संस्थेकडून अजय लोंढे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button