breaking-newsपिंपरी / चिंचवड

यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या आयआयएमएसमध्ये गिरविले योगाचे धडे

पिंपरी, (महाईन्यूज) – आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोआयटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सायन्स अर्थात आय. आय. एम. एस.मध्येही योग दिन साजरा करण्यात आला.

आपल्या धावपळीच्या  जीवनात  प्रत्येकानी योगासने करण्याची सवय अंगिकारली पाहिजे, विशेषतः विद्यार्थ्यानी तर आवर्जून योगासनांकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे मत योग प्रशिक्षक श्रद्धा नाशिककर यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक व अन्य कर्मचारी यांनी आपला सहभाग नोंदवला. योग दिन आयोजनासाठी ग्रंथपाल पवन शर्मा यांनी विशेष प्रयत्न केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button