breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

IND vs WI : वेस्ट इंडिजविरूद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

IND vs WI : भारतीय संघ १२ जुलैपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात कसोटी, वनडे आणि टी-२० मालिका खेळल्या जाणार आहेत. यामध्ये २ कसोटी, ३ वनडे आणि ५ टी-२० सामने खेळले जाणार आहेत. बीसीसीआयने कसोटी आणि वनडेसाठीचा संघा यापुर्वीच जाहीर केला होता. दरम्यान आता टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याकडे कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

अजित आगरकर यांची काही दिवसांपुर्वी क्रिकेट सल्लागार समितीने निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर त्यांनी टी-२० मालिकेसाठी भारतीय संघातील खेळाडूंची निवड केली आहे. वेस्ट इंडिज विरूद्धच्या या मालिकेसाठी १५ खेळाडूंना संघात संधी मिळाली आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय टी-२० संघ :

हार्दिक पांड्या (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जसस्वाल, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार.

हेही वाचा – ‘Pimpri-Chinchwad Idol 2023’ : ‘पिंपरी-चिंचवड आयडॉल २०२३’ स्पर्धेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

https://twitter.com/BCCI/status/1676612462601461761?

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल , मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्य कुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (वीसी), शार्दुल ठाकूर, आर जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button