breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सत्ताधारी भाजपने पिंपरी चिंचवड महापालिकेचे वाटोळे केलं – मारुती भापकर

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|

महापालिकेत भाजपला शहरातील सर्वसामान्य जनतेने अत्यंत विश्‍वासाने सत्ता दिली. मात्र टक्केवारीच्या राजकारणात या पक्षाने महापालिकेचे अक्षरश: वाटोळे केल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

येस बॅंकेत 984 कोटी रुपये अडकल्यानंतर भापकर यांनी सत्ताधारी भाजपाचे पदाधिकारी आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यावर सडकून टीका केली आहे. भापकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेची रक्कम राष्ट्रीयकृत बॅंकेत ठेवावी, असे निर्देश असतानाही महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी टेबलाखालून मिळणाऱ्या टक्केवारीसाठी ही रक्कम “येस’ बॅंकेत गुंतविली. मोठे व्याज मिळणार असल्याचे सांगत स्वत:ची पाठही थोपटून घेतली. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी याच बॅंकेची स्तुती करत मिळणाऱ्या व्याजातून शहरातील विकासकामे होणार असल्याचे सांगत भाजपाच्या नेत्यांची पाठही थोपटली. मात्र हा संपूर्ण प्रकार स्वहितासाठीच होता हे आता स्पष्ट झाले आहे.

“येस’ बॅंकेवर निर्बंध लादल्यामुळे शहरातील सर्वसामान्यांकडून कररुपाने जमा झालेली तब्बल 984 कोटी रुपयांची रक्कम बुडण्याची भीती असून नागरिकांच्या माथी आर्थिक भुर्दंड बसला जावू शकतो. माजी मुख्यमंत्र्यांनी ऍक्‍सिस बॅंकेत वळविलेल्या खात्यामुळे त्यांना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोटीस बजाविली आहे. त्याच धर्तीवर महापालिकेची रक्कम खासगी बॅंकेत वळविणाऱ्या आयुक्तांची व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचीही चौकशी उच्चस्तरीय समितीमार्फत करण्यात यावी, अशी मागणी भापकर यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button