breaking-newsक्रिडा

विराट-विल्यमसनबद्दलचा ११ वर्षांनंतर जुळून आला हा योगायोग, निकालही तोच लागणार?

विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उपांत्य सामना ९ तारखेला होणार आहे. या सामन्यात विराट कोहली भारतीय संघाचे तर न्यूझीलंड संघाचे विल्यमसन नेतृत्व करत आहे. या विश्वचषकात दोन्ही कर्णधार पहिल्यांदाच आमने-सामने येत आहे. पावसामुळे साखळी दोन्ही संघातील साखळी सामना वाहून गेला होता. पण उपांत्य फेरीत दोन्ही संघ एकमेंकासमोर उभे ठाकणार आहेत. कोहली आणि विल्यमसन विश्वचषकात एकमेंकासमोर उभे ठाकण्याची काही पहिली वेळ नाही. याआधी दोन्ही कर्णधार विश्वचषकात एकमेंकाविरोधात लढले आहेत. २००८ मध्ये अंडर-१९ च्या विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी भारतीय संघाच्या कर्णधारपदी कोहली होता तर न्यूझीलंड संघाची धूरा विल्यमसनच्या खांद्यावर होती.

एकदिवसीय विश्वषकचा इतिहास पाहिला असता न्यूझलंडने आठव्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तर भारतीय संघाने सातव्यांदा उपांत्य फेरी गाठली आहे. ९ तारखेला होणाऱ्या उपांत्य सामन्यामध्ये कोण जिंकणार हे येणारा काळच ठरवेल. मात्र, सोशल मीडियावर विराट-विल्यमसन यांच्या ११ वर्षापूर्वीचा फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये भारत पुन्हा एकदा इतिहास घडवणार असे म्हटले जात आहे.

२००८ मध्ये अंडर १९ विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने विल्यमसनच्या न्यूझीलंड संघाचा पराभव केला होता. हाच योगायोग पुन्हा घडेल असे चाहत्यांना वाटतेय. सोशल मीडियावर ते आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

११ वर्षानंतर दोन्ही कर्णधार पुन्हा एकदा विश्वचषकात नेतृत्व करत आहेत. अंडर-19 विश्वचषकातील उपांत्य सामन्यात रवींद्र जडेजा, ट्रेंट बोल्ट आणि टिम साउदी हे खेळाडूही होते.. अंडर१९ च्या उपांत्य सामन्यात अष्टपैलू खेळीबद्दल कोहलीला सामनाविरचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. कोहलीने गोलंदाजी करताना दोन बळी घेतले होते आणि फलंदाजीमध्ये ४३ धावांचे योगदान दिले होते. विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा तीन विकेटने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. सोशल मीडियावर सध्या याच गोष्टीची चर्चा आहे.

विराट कोहली आणि विल्यमसन यांचा ११ वर्षापूर्वीचा आणि आजचा फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये विराट कोहली पुन्हा एकदा जिंकणार असा कयास लावला जात आहे. मात्र, विल्यमसनही ११ वर्षापूर्वीचा आपला बदला घेण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. ९ तारखेला होणाऱ्या सामन्यात विल्यमसन हिशेब चुकता करणार का? की विराट कोहली पुन्हा एकदा इतिहास लिहणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button