breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्रात वेगवेगळे विभाग आणि जिल्हा परिषदा मिळून 2 लाख 193 पदे रिक्त – राज्य सरकारचा अहवाल

राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे विभाग आणि जिल्हा परिषदा मिळून 2 लाख 193 पदे रिक्त असल्याचा अहवाल समोर आला आहे…महाराष्ट्रातल्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये रिक्त पद ही एक मोठी समस्या आहे अशी कर्मचारी संघटनांची नेहमी तक्रार असते. त्या तक्रारीला पूरक अशी माहिती माहितीच्या अधिकारामधून बाहेर आली आहे. बारामतीचे माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी राज्य सरकारकडे राज्यातल्या जिल्हा परिषदा आणि विविध शासकीय विभागांमध्ये किती पदे रिक्त आहेत याची माहिती मागवली होती. राज्य सरकारने नितीन यादव यांना ही माहिती इमेल द्वारे दिली. ह्या माहिती मध्ये 31 डिसेंबर 2019 अखेर किती पदे रिक्त आहेत याचा तपशील देण्यात आला आहे.

राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे विभाग आणि जिल्हा परिषदा मिळून 2 लाख 193 पदे रिक्त आहेत. सरळसेवा, पदोन्नती मिळून वेगवेगळ्या विभागासाठी 10 लाख 91 हजार 104 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 8 लाख 98 हजार 911 पदे भरली गेली आहेत. उर्वरीत मंजुर पदाची भरती न झाल्यामुळे 2 लाख 193 पदे रिक्त आहेत. रिक्त पदामध्ये विविध महामंडळं जसं की खादी ग्राम उद्योग एसटी महामंडळ याचा समावेश नाही.

रिक्त पदे आणि विभाग

गृह विभागांमध्ये सर्वात जास्त सुमारे 28 हजार पदे रिक्त आहेत
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये 20,509 पदं रिक्त आहेत
जलसंपदा विभागामध्ये 20873
कृषी विभागांमध्ये सुमारे 14 हजार
महसूल आणि वन विभागामध्ये सुमारे 12 हजार
शालेय क्रीडा विभागामध्ये सुमारे 5 हजार
आणि सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये 8 हजार 628 पदे रिक्त आहेत.

एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असतानाही राज्य सरकारने गेल्या पाच वर्षांमध्ये नोकरभरती केलेली नाही. त्याहीआधी भरती झाली नव्हती. पुढची मेगाभरती केव्हा होईल याची खात्री नाही.


Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button