TOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

संत तुकाराम साखर कारखान्याची लक्षणीय दानशूरता!

भंडारा डोंगरावरील मंदिरासाठी संत तुकाराम साखर कारखान्याकडून सव्वा कोटींची देणगी

संत तुकाराम महाराज मंदिरासाठी भरघोस देणगी देणारा पहिलाच साखर कारखाना

सोमाटणे : संत तुकाराम साखर कारखान्याकडून भंडारा डोंगर येथील संत तुकाराम महाराज मंदिरासाठी सुमारे एक कोटी २५ लाख रुपये देणगी म्हणून देण्यात आली आहे. ही देणगी ऊस उत्पादक शेतकरी, संचालक, सभासद, कर्मचारी आणि कारखाना यांच्यावतीने देण्यात आली आहे. आजपर्यंत या मंदिरासाठी सर्वात जास्त देणगी देणारा हा पहिलाच कारखाना ठरला आहे. अशी माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी दिली.

याबाबत बोलताना भेगडे म्हणाले की, ही देणगी कारखान्याशी संबंधित असणाऱ्या सर्व घटकांनी मिळून दिली आहे. संत तुकाराम महाराज यांच्या मंदिरासाठी आम्ही आणखी लागले तरी देवू. कारखान्याबरोबर ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्यातील कर्मचाऱ्यांना आणि व्यवस्थापनाला देणगी द्यावी वाटणे, हीच मुळी सुखद गोष्ट आहे. हे संस्कार तुकाराम महाराजांनीच या मातीत पेरले आहेत.

संत तुकाराम मंदिरही देशाबरोबर जगात प्रसिद्ध होईल…
जे आज भरभरून उगवून येत आहेत. हिंदू नागर शैलीतील हे मंदिर म्हणजे पुणे जिल्ह्याचे नाव राज्यात आणि देशातच नव्हे तर जगाच्या पाठीवर अधोरेखित करणारे आहे. अशा मोठ्या देणग्यातूनच हे काम पूर्णत्वास येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाचा एक न एक रुपया सार्थकी लागल्याची भावना प्रत्येकामध्ये निर्माण झाली आहे.अयोध्येत राम आणि भंडारा डोंगर येथील संत तुकाराम या दोन्ही मंदिरात ‘राम’ हा एक समान धागा आहे. भंडारा डोंगरावरील संत तुकाराम महाराज यांचे मंदिर, अयोध्येतील राम मंदिर, गुजरातमधील अक्षरधाम या तीनही मंदिरांचे आर्किटेक्ट एकच आहेत. त्यामुळे हे मंदिरही देशाबरोबर जगात प्रसिद्ध होईल.

संत तुकाराम महाराजांच्या मंदिरासाठी काही तरी करता आले ही बाब मुळी आमच्यासाठी आनंदाची आहे. कारखान्याला महाराजांचे नाव देण्यात आले आहे. राज्यामध्ये आमचा एकमेव कारखाना असेल जो कर्जबाजारी नाही. त्यामुळे महाराजांच्या मंदिरासाठी काही करणे हे आमचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे.
– बापूसाहेब भेगडे, उपाध्यक्ष, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना

तुकाराम महाराजांच्या मंदिरासाठी आमचे अजून पैसे गेले तरी चालतील परंतु हे मंदिर होणे म्हणजे आमच्यासाठी आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे.
– मंदाकिनी हिरामण पवार, ऊस उत्पादक शेतकरी

संत तुकाराम महाराज यांच्या मंदिरासाठी सर्वाधिक देणगी देणारा पहिलाच कारखाना संत तुकाराम महाराजांसाठी आम्ही आणखी पैसे द्यायला सुद्धा तयार झालो असतो. महाराज म्हणजे राज्याची अस्मिता आहे. उलट आम्ही भाग्यवान आहोत असे आम्ही समजतो.
– संदीप गराडे, कामगार युनियन

अध्यक्ष, संत तुकाराम कारखाना कारखान्याचे सव्वा कोटी प्राप्त झाले आहेत. कारखाना उत्तरोत्तर प्रगती करतोय हाच महाराजांचा आशीर्वाद आहे. कारखान्याचेआम्हाला सव्वा कोटी जितके महत्वाचे आहेत, तितकेच अगदी गरीब वारकऱ्यांचे, कामगारांचे १० रुपयेही महत्वाचे आहेत.
– बाळासाहेब काशीद, अध्यक्ष, श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट

मंदिराची वैशिष्टे आणि तपशील
* संत तुकाराम महाराजांचे हे भव्य मंदिर (नागरशैली- हिंदु मंदिर) जगप्रसिध्द गुजरात येथिल गांधीनगरचे अक्षरधाम मंदिराच्या आधारावर बनविण्यात येणार आहे.
* मंदिराची लांबी – १७९ फुट व उंची -८७ फुट व रूंदी – १९३ फुट आहे.
* मंदिराला तीन भव्य कळस असतील.
* मंदिराला ९ व गर्भगृहाला ५ दरवाजे आणि ६ खिडक्या असतील.
* मंदिराचा कळस सुमारे ९६ फुट ते ८७ फुट एवढा मोठा आकाराचा असेल जिथे एकाच वेळी अनेक भक्त दर्शनाचा लाभ घेऊ शकतील.
* मंदिराचा घुमट हा ३४ फुट बाय ३४ फुट या आकाराचा असेल त्यामुळे मंडपाची शोभा वाढेल.
* मंदिरातील गर्भगृह १३.५ बाय १३.५ फुट आकाराचे असतील.
* मंदिराचे फाउंडेशन ९ फुट उंचींचे असेल.
* मंदिरात ५ गर्भगृह आहेत.
* मंदिरात मुख्य जागेवर विठ्ठल रुख्मिणीच्या मुर्तीची प्रतिस्थापना होईल व संत तुकारामांची मुर्ती ही त्यांच्या समोरच्या बाजुला बसविण्यात येणार आहे.
* मंदिरात भक्तासांठी प्रदक्षिणा मार्ग असेल.
* मंदिराच्या मंडपावर व भिंतीवर बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम व कोरीव काम असेल.
* मंदिराच्या छतावर देखील सुंदर असे नक्षीकाम पाहावयास मिळेल.
* मंदिराचे बाहेरील खांब हे चौरसाकृती व आतील खांब हे अष्टकोनाकृती असतील व त्यावर २२०० वैष्णवांच्या मुर्तीचे कोरीवकाम केलेले असेल.
* मंदिराच्या समोर उजवीकडे व डावीकडे श्रृंगार चौक असतील.
* तुकाराम महाराजांनी ज्या वृक्षाखाली बसुन गाथा लिहिली तो नांदुरकी वृक्ष देखील मंदिराच्या बाहेरील भागात मंदिराचाच एक घटक म्हणुन असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button