breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

कृषी कायद्याविरोधात बातचीत करण्यासाठी शरद पवार थेट राष्ट्रपतींना भेटणार

मुंबई – देशात सध्या शेतकरी वर्ग कृषी कायद्याविरोधात प्रचंड आक्रमक झालेला दिसत आहे. गेल्या १० दिवसांपासुन शेतकऱ्यांचे केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. यात देशभरातील जवळपास ४० शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत. आता माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी कायद्यांविरुद्ध आवाज उठवण्याचा शड्डू ठोकला आहे.

आवश्य वाचा:- कृषी कायद्याबाबत शहाणपणाची भूमिका घ्या, शरद पवारांचा केंद्र सरकारला सल्ला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. ९ डिसेंबरला संध्याकाळी ५ वाजता ही भेट होणार असल्याची माहिती मिळत आहे. यावेळी पवार यांच्यासोबत अन्य राजकीय पक्षांचे काही नेते उपस्थित असणार आहेत. दरम्यान, राज्यमंत्री बच्चु कडू देखील चलो दिल्लीचा नारा देत बाईकवरून दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेेत. त्यामूळे शरद पवार आणि राष्ट्रपती यांच्या भेटीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांना शरद पवार न्याय मिळवून देणार का हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button