भाजप नेत्यावर ईडी कारवाई दाखवा, एक लाख रूपये मिळवा; राष्ट्रवादीकडून फलकबाजी
पुणे : राज्यात विरोधी पक्षातील नेत्यांवरी ईडीच्या कारवाई होत असल्याचं वारंवार म्हटलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना देखील गेल्या काही दिवसांपुर्वी ईडीची नोटीस आली आहे. दरम्यान, यावरून, जयंत पाटील यांना ईडीची नोटीस अल्याच्या निषेधार्थ युवक राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप नेत्यांवर ईडी कारवाई दाखवा, एक लाख रूपये मिळवा असा फलक सांगलीतील जत बसस्थानकासमोर लावला आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना चार दिवसांपुर्वी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस ईडीकडून देण्यात आली आहे. चौकशीसीठी हजर राहण्यास दहा दिवसांची मुदत जयंत पाटील यांनी मागितली आहे.
हेही वाचा – परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्यात कोण सर्वात जास्त श्रीमंत?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हा फलक लावण्यात आला असून यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर जतमधील बसस्थानकासमोर दर्शनी ठिकाणी डिजीटल फलक शनिवारी रात्री लावण्यात आला आहे.