breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

#COVID19: सांगली जिल्ह्यातील नागरिकांसाठी दिलासा…कोरोना टेस्ट करण्यासाठी पुण्याला जाण्याची गरज नाही! (व्‍हीडिओ)

सांगली । महाईन्यूज । प्रतिनिधी

सांगलीतील नागरिकांना कोरोना विषाणूबाबत तपासणी करण्यासाठी आता पुण्याला जाण्याची गरज नाही. कारण, मिरज येथील सिव्‍हील हॉस्पिटलमध्ये कोरोना तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती विशेष तज्ज्ञ समितीच्या प्रमुख व मुंबईतील जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली.

सांगली-इस्लामपूर येथील एकाच कुटुंबातील २३ लोकांना कोरोनाची लागण झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. सध्या सांगली मिरज येथील सिव्‍हील हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित २५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णालयातील आंतररुग्ण विभागामध्ये संबंधित कोरोना रुग्ण ठेवण्यात आले आहेत. याठिकाणी मिरज वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, विशेष तज्ज्ञ समितीच्या प्रमुख आणि मुंबईच्या जे.जे. रुग्णालयाच्या अधीष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या नेतृत्त्वाखाली या कोरोना रुग्णालयात काम सुरू आहे. कोरोना विभागाशी समन्वय साधण्याचे काम मुंबईतून तज्ज्ञ डॉ. विनायक सावर्डेकर, प्रशांत व्‍होवाळ या दोघांनीही काम सुरू केले आहे.

काय म्हणाल्या डॉ. पल्लवी सपाळे पहा…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button