breaking-newsताज्या घडामोडी

#CoronaVirus |औरंगाबादेत मास्क न लावल्याने तीन जणांविरोधात गुन्हा

औरंगाबाद | संचारबंदी असताना मास्क न लावता इतरांना धोका निर्माण करणाऱ्या तीन जणांविरोधात औरंगाबादच्या क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे लोक मास्क न लावता फिरत होत. पोलिसांनी त्यांना विचारपूस करून ताब्यात घेतले आणि गुन्हा दाखल केला आहे.

कोरोनासंदर्भात आक्षेपार्ह आणि सामाजिक तेढ निर्माण करणारे व्हिडिओ टिकटॉक अँपवर व्हायरल करणे मालेगावात चौघांना चांगलेच महागात पडले. या प्रकरणी मालेगाव शहरात दोन वेगवेगळ्या पोलिस स्थानकात चौघांविरुद्ध गुन्हे दाखल करून चौघांनाही अटक करण्यात आलीये.. अब्दुल रहीम अब्दुल खैर कुरेशी , सैय्यद हुसेन सैय्यद अली , सुफियान शेख मुख्तार तसेच रमजानपुरा पोलीस स्थानकात सैय्यद जमील सैय्यद बाबु अशी या चौघांचीनावं आहेत.. या चौघांनी “वेलकम टू इंडिया कोरोना व्हायरस ” असा सामाजिक आणि धार्मिक तेढ निर्माण करणारा व्हिडिओ तयार करून टिकटॉकवर प्रसारित केला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button