breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिवाजी महाराज बदनामी प्रकरण; रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास चालढकल, संभाजी ब्रिगेडचा आमरण उपोषणाचा इशारा

पिंपरी / महाईन्यूज

छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्याप्रकरणी आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून टाळाटाळ केली जात आहे. याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

यासंदर्भात संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे यांनी प्रसिध्दीपत्र दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाबाबत जाणीवपूर्वक प्रश्न चिन्ह निर्माण करून रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा दूरपर्यंत कसलाही संबंध नाही. तरी देखील छत्रपती शिवाजी महाराजांना जाणीव पुर्वक कमी लेखून रामदास स्वामीचे उदात्तीकरण करण्याचा अनैतिहासिक प्रयत्न आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांनी केलेला आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने श्री श्री रविशंकर यांचेवर गुन्हा दाखल करण्यासाठी अनेक निवेदने देऊन तसेच आंदोलने करुन देखील अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही.

पोलीस प्रशासन रविशंकर यांचेवर जरा जास्तच मेहरबान असल्याचे दिसते. श्री श्री रविशंकर यांना हे सरकार पाठीशी घालत असल्याचे दिसते. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता आहेत. महाराजांचा अपमान संभाजी ब्रिगेड सहन करणार नाही. अखंड विश्वाचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्याप्रकरणी आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांचेवर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने २ जानेवारी २०२० पासून वाकड पोलिस स्टेशन, पोलिस उपायुक्त, पोलिस आयुक्त तसेच पुणे जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री यांना अनेक निवेदने दिली.

आंदोलने करुन देखील श्री श्री रविशंकर यांचेवर गुन्हा दाखल न केल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत फिजिकल डिंटन्स पाळून, मास्क लावून मंगळवारी (दि. १०) सकाळी १० वाजता पोलिस आयुक्त कार्यालयाच्या समोर, प्रेम लोक पार्क, चिंचवड येथे आमरण उपोषण करण्यात येणार आहे.” अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा अध्यक्ष विशाल तुळवे, उपाध्यक्ष सतिश काळे, कार्याध्यक्ष गणेश दहिभाते, संघटक ज्ञानेश्वर लोभे यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button