breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अश्‍लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; महिलेकडून उकळले पाच लाख

पिंपरी |महाईन्यूज|

अश्‍लील व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडून पाच लाख रूपये उकळले. पैसे देण्याचे बंद केल्यानंतर अश्‍लील व्हिडिओ काही जणांना पाठवून महिलेची बदनामी केल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.

अमित मिरसिंग शर्मा (वय 40, रा. मारूंजी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. आरोपीने फिर्यादीशी ओळख वाढवून त्यांच्याशी शारीरिक संबंध केले. त्यावेळी फिर्यादीच्या नकळत काढलेला व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन फिर्यादीला पाच लाख रूपये देण्यास भाग पाडले.

फिर्यादीने पैसे देणे बंद केल्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या जीमेल अकाउंटवर अश्‍लील मेसेज पाठविले. तसेच फिर्यादीच्या मॅनेजरच्या व्हॉटसऍपवर फिर्यादी व आरोपी यांच्यातील शारीरिक संबंधाचे व्हिडिओ पाठवून फिर्यादीची बदनामी केली. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button