breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

‘हरित शहर’ राबवण्याच्या संकल्पनेला फासला हरताळ; वृक्षगणना रखडली, ठेकेदाराला अडीच लाखाचा दंड

  •  वृक्षगणना रखडली, ठेकेदाराला अडीच लाखाचा दंड
  • आयुक्तांची नाराजी, मे 2021 पर्यंत मुदतवाढ द्या, ठेकेदाराची मागणी

पिंपरी- महापालिका हद्दीत बेकायदेशीर वृक्षतोड वाढली आहे. लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपन देखील व्यवस्थित होत नाही. मागील बारा वर्षात वृक्षांची संख्या भरमसाठ असल्याचा दावा उद्यान विभागाकडून केला जात आहे. मात्र, सन 2005 ते 2017 पर्यंत शहरातील वृक्षगणनाच केली नसल्याचे आढळून आले. त्यानंतर आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी 11 जानेवारी 2018 मध्ये सॅटेलाईट इमेजद्वारे वृक्षगणना करण्याचे आदेश दिले. तरीही मागील पावणे तीन वर्षात सुमारे तीन प्रभागातील वृक्षगणना केली आहे. त्यामुळे आयुक्तांच्या ‘हरित शहर’ राबवण्याच्या संकल्पनेला हरताळ फासल्याचे दिसत आहे.

पर्यावरणाच्या दृष्टीने शहरी क्षेत्राच्या एकूण तीस टक्के क्षेत्रावर झाडे असतील, तरच वाहनांचे प्रदूषण कमी होऊ शकते, असे महापालिकेच्या उद्यान विभागाकडून सांगण्यात येत आहे. तसेच उद्यान विभाग दरवर्षी हजारोच्या संख्येत शहरामध्ये झाडांची लागवड करत आहे. मात्र, उद्यान विभागाने 2005 पासून 2017 पर्यंत वृक्षगणनाच केलेली नाही. त्यावर आयुक्त श्रावण हर्डिकर लक्ष देवून 2017 मध्ये निविदा राबवून सॅटेलाईट इमेजद्वारे वृक्षगणना करण्यासाठी मे. टेराकॅन इकोटेक प्रा. लि. कंपनीला काम देण्यात आले.
 
महापालिकेने सॅटेलाईट इमेजद्वारे वृक्षगणना करण्यात येत आहे. टेराकॅन इकोटेक कंपनीला दोन वर्षांसाठी कामाची मुदत देण्यात आली. या कामास तब्बल 6 कोटी 80 लाख 53 हजार 559 रुपये खर्च करणार आहेत. यापैकी सॉफ्टवेअर, यंत्रसामग्री खरेदीसाठी कंपनीला दोन कोटी रुपये अदा केले आहे. मागील पावणे तीन वर्षात वृक्षगणनेला दिरंगाई झाली आहे. ठेकेदाराची मुदत यंदा मार्चमध्ये संपली आहे. कामास उशिर झाल्याने ठेकेदार कंपनीला प्रतिदिन एक हजार रुपये दंड सुरु असून आतापर्यंत दोन लाख 38 हजाराचा दंड आकारला आहे.

दरम्यान, सदरील ठेकेदाराला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी फेटाळला होता. आयुक्तांनी त्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाईचे आदेश दिले. त्यानूसार दंडात्मक कारवाई सुरु आहे.
 

वृक्षगणनेचे आॅडीट सुरु  
पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात उद्यान विभागाकडून वृक्षगणनेचे काम हाती घेतले आहे. वृक्ष गणनेचे काम मे. टेराकॅन इकोटेक प्रा. लि. कंपनीकडून सुरु आहे. कंपनी ठेकेदाराने कामास दिरंगाई केल्याने सदरील वृक्षगणनेचे महाराष्ट्र वन विकास महामंडळाद्वारे नियुक्ती करुन आॅडीट करण्यात येत आहे. त्यानूसार अ, ब, क या तीन प्रभागात करण्यात आलेले आहे.

महापालिकेच्या अ, ब, क या प्रभागातील वृक्षगणना पुर्ण झालीय, सध्यस्थिती ह प्रभागात काम सुरु आहे. आजअखेर 9 लाख झाडांची मोजणी केलीय, ठेकेदाराला मुदतवाढ देण्याबाबत प्रस्ताव वृक्ष संर्वधन प्राधिकरण समिती पुढे ठेवण्यात येईल. तसेच वृक्षगणनेमुळे झाडाचा प्रकार, त्याचे नेमके ठिकाण, आकार, उंची आदी  माहिती संकलित होणार आहे.
सतीश इंगळे – उपायुक्त, वृक्ष व उद्यान विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button