breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान, श्रीपाद छिंदमला ‘या’ पक्षाकडून दिली उमेदवारी

अहमदनगर |महाईन्यूज। 

राज्यभर चर्चेचा विषय ठरलेले व शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या श्रीपाद छिंदमला बसपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. अहमदनगर शहर मतदार संघातून छिंदम निवडणूकीच्या रिंगणात उतरण्यात आहेत. शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने छिंदमला राज्यभरातून रोषाला सामोरं जावं लागलं होतं.

नगर शहर मतदारसंघातून शिवसेनेचे अनिल राठोड तर राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप निवडणूकीच्या रिंगणात आहे. त्यातच आता छिंदमने उडी घेतल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चांनी जोर पकडला आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरलेल्या श्रीपाद छिंदमला राज्यभरातून रोषाचा सामना करावा लागला होता. तरी देखील अहमदनगरच्या जनतेने मात्र त्याला स्वीकारले आहे. अहमदनगर महापालिका निवडणुकीत श्रीपाद छिंदम वॉर्ड क्रमांक 9 मधून 2000 पेक्षा जास्त मते घेऊन विजयी झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button