breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरात तुफान पाऊस, चाकरमान्यांची फजिती

पुणे |महाईन्यूज|

पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरात परिसरात ढगांच्या गडगडाटासह पावस झाला आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले होते. पुणे शहर आणि परिसरामध्ये पुढील पाच दिवस ढगांच्या गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेकडून वर्तवण्यात आली आहे.

अचानक आलेल्या पावसामुळे पिंपरी-चिंचवड, पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. तासभर झालेल्या पावसाने पुण्याची वाट लावली. अक्षरशः अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले. कर्वे पुतळा चौक परिसरात दुचाकी वाहने निम्मी पाण्याखाली गेली आहेत. जंगली महाराज रोडवर पाणी तुंबल्याने वाहन चालकांचे चांगलेच हाल झाले. पावसाला सुरुवात झाल्यानंतर शहरातील कमाल तापमान २४ अंश सेल्सिअसच्या इतके झाले आहे. पावसाच्या विश्रांतीनंतर तापमान ३० अंश सेल्सिअसच्या जवळपास पोहचले होते.

दरम्यान ४ ऑक्टोबरला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. ५ ऑक्टोबरला कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज असून ६ ऑक्टोबरला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button