breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

भाजपने डावललं, राष्ट्रवादीने तारलं; जोरदार शक्तीप्रदर्शनाने सुनिल शेळकेंनी भरला अर्ज

पिंपरी |महाईन्यूज|

मावळ विधानसभा मतदारसंघातून आज सुनिल शेळके यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपकडून यंदा उमेदवारी मिळेल, याकरिता शेवटपर्यंत वाट बघितली. त्यानंतर भाजपचे नेते सुनील शेळके यांना शेवटच्या क्षणाला राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी घेतली. त्याच्या उमेदवारीने विद्यमान आमदार बाळा भेगडे यांना सुनील शेळके कडवे आव्हान देणार आहे.

सुनील शेळके यांनी वडगाव येथील निवडणूक कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शेळके यांनी केलेले अभूतपूर्व शक्तिप्रदर्शन विरोधकांच्या मनात धडकी भरवणारे ठरले आहे. जवळपास 25 ते 30 हजार मतदार नागरिक व कार्यकर्ते या शक्तीप्रदर्शनात सहभागी झाले होते. यामुळे मुंबई-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वडगाव बाजारपेठेत शेळके समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे, टोप्या, मफलर तसेच अनेक नेत्यांच्या जयघोषाने वडगाव शहर राष्ट्रवादीमय झाले होते. 

मावळ तालुक्यातून भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांकडून जबरदस्त फिल्डिंग लावण्यात आली होती. त्यात सुनील शेळके तसेच माजी आमदार दिगंबर भेगडे यांचे पुतणे रविंद्र भेगडे यांचा समावेश होता. माजी आमदार दिगंबर भेगडे यांनी तसेच पक्षातील इतर जेष्ठ नेत्यांनी वरिष्ठांना मावळातून उमेदवारीसाठी नवीन चेहरा द्यावा, अशी मागणी केली होती. परंतु पक्षश्रेष्ठींकडून मागणी मान्य न झाल्याने माजी आमदार दिगंबर भेगडे यांनी पक्षाविरोधात बंडाचे हत्यार उपसून पुतणे रविंद्र भेगडे यांना निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उभे करण्याचा निर्णय घेत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

भाजपमधून होणारी बंडखोरी बाळा भेगडे यांच्यासाठी डोकेदुखीची ठरणार असून पक्षांतर्गत होत असलेला गटबाजीची उमेदवारांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे बाळा भेगडे यांच्यासमोरील आव्हान अधिक कडवे झाले आहे. भाजपने उमेदवारी डावलल्याने भाजपचे इच्छुक असलेले उमेदवार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ आपल्या मनगटावर बांधून रणशिंग फुंकले आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button