breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिक्षण विभागाचा उरफाटा कारभार, विकल्प भरून घेण्याची मुदत संपल्यानंतर घेतली शिक्षकांची कार्यशाळा

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील सर्व शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. त्यासाठी विकल्प अर्ज भरून घेण्यास शिक्षकांना सात दिवसांची मुदत देण्यात आली. ही मुदत संपल्यानंतर शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिका-यांना विकल्प अर्ज भरण्याबाबतची माहिती देण्यासाठी शिक्षकांची कार्यशाळा घेण्याचे शहानपण सूचले. शिक्षण विभागाचा उरफाटा कारभार सुरू असल्याने शिक्षकांची तारांबळ उडत आहे.

शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्सना शिंदे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे पाठपुरावा केला नाही. म्हणून आयुक्तांनी शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचे निर्देश असताना आदेशावर स्वाक्षरी केली नाही. यामुळे हा वेतन आयोग लागू होण्यास विलंब लागला. शेवटी आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी मध्यस्ती केल्यानंतर आयुक्त हर्डीकर यांनी याबाबतचा आदेश काढला. त्यानंतर विकल्प भरून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. या वेतनश्रेणीचा लाभ घेण्यासाठी शिक्षकांमध्ये विकल्प भरण्याबाबत गोंधळाची स्थिती होती. त्यांना मार्गदर्शन करणे हा प्रशासनाचा भाग नसला तरी त्रयस्थ संस्थेच्या माध्यमातून तत्संबंधीत माहिती घेण्यासाठी वेळ देणे गरजेचे असते. मात्र, त्यांना वेळेत माहिती देण्यात आली नाही.

शिक्षकांचे विकल्प अर्ज भरून घेण्यासाठी प्रशासनाने त्यांना सात दिवसांची मुदत दिली होती. त्याचा आदेश ज्योत्सना शिंदे यांनी 5 फेब्रुवारी रोजी काढला. ही सात दिवसांची मुदत उलटून गेल्यानंतर प्रशासन अधिकारी शिंदे यांना याबाबतची कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करण्याचे शहानपन सूचले. विकल्प अर्ज भरून देण्याची मुदत संपल्यानंतर 20 फेब्रुवारी रोजी त्यांनी याबाबतची कार्यशाळा घेण्याचा सूचना आदेश काढला. ही कार्यशाळा ड प्रभाग कार्यालयात सकाळी दहा ते अकरा आणि दुपारी एक ते दोन या वेळेत घेण्याचे नियोजन केले. कोणाचे तरी ऐकून प्रशासन अधिकारी शिंदे या प्रशासकीय कामकाज करत आहेत, असा संशय निर्माण झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button