breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी महापालिकेच्या राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानात घोटाळा; आयुक्तांकडून चाैकशीचे आदेश

आमदार लक्ष्मण जगताप यांचे पत्र, संबंधिताची चाैकशी करुन दोषीवर फाैजदारी दाखल होणार

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी महापालिकेच्या राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानात लाखो रुपयाचा घोटाळा झाला आहे. बोगस लाभार्थी दाखवून कंत्राटी कर्मचा-यांनी लाखो रुपये लाटले आहेत. मात्र, विविध व्यवसायांना कर्ज मिळवून देतो, असे सांगून पात्र लाभार्थ्यांकडून आर्थिक वाटाघाटी करुन फसवणूक झाली आहे. परंतू, या योजनांमुळे पालिकेचे नाव बदनाम झाले असून संबंधित कंत्राटी कर्मचा-यांची चाैकशी करुन दोषी आढळल्यास फाैजदारी दाखल करा, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली आहे. दरम्यान, सदरील प्रकरणाची आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून चाैकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

पिंपरी चिंचवड शहरातील सर्वसामान्य नागरिकांना दोन लाख रुपयापर्यंत व्यावसायिक कर्ज उपलब्ध करुन त्यांना व्यवसाय करण्यास मदत करण्यात येते. याकरिता दीनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय शहरी आजीविका मिशन राबविले जात आहे. या योजनेंतर्गत पालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाकडे 2014 ते 8 आॅक्टोबर 2018 पर्यंत एकूण 859 अर्ज प्राप्त झाले. त्यातील चार वर्षांत 80 प्रकरणे मंजूर केली आहे तर 222 गोरगरीब, अत्यल्प उत्पन्न असणाऱ्या नागरिकांनी व्यावसायिक कर्ज नामंजुर केली आहेत. त्यातील 103 अद्याप प्रलंबित आहेत. परंतू, 454 प्रकरणे ही महापालिकेच्या नागरवस्ती आणि विविध बॅंकाकडे उपलब्ध नसल्याने ती प्रकरणे गहाळ झालेली आहेत.

या योजनेंतर्गत पात्र नागरिकांना दोन लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध होते. त्या कर्जांतून नागरिकांना गारमेंन्ट, किराणा शॉप, फॅब्रीकेशन, ट्रान्सपोर्ट, केटरिंग, फोटो स्टुडिओ, फुटवेअर, प्रिटींग वर्क, स्टील मटेरियल, इलेट्रॉनिक शॉप, ब्युटीपार्लर, टीव्ही केबल बिझीनेस यासह अनेक छोट्या व्यवसायाला हे कर्ज दिले जाते परंतू, विविध बॅंकानी अद्याप लाभार्थ्यांना कर्ज पुरवठा केलेला नाही.

तसेच महापालिकेच्या एनयुएलएम योजनेचा मानधनावर काम करणा-या माजी व्यवस्थापकाने कित्येक नागरिकांकडून 10 ते 20 हजार रुपये प्रत्येक घेवून त्याना कर्ज मंजूर करुन देतो, असे सांगितले होते. संबंधित माजी व्यवस्थापकाने नागरिकांकडून हजारो रुपये वसुल केले आहेत. त्यानंतरही नागरिकांची प्रकरणे बॅंकाकडून मंजूर झालेली नाहीत. त्यामुळे नागरिकांनी त्या व्यवस्थापकाकडे तगादा लावल्याने त्याने महापालिकेतील मानधनाची नोकरी सोडून फरार झाला आहे.

याबाबत आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिलेल्या पत्रात म्हटले की, सदरील प्रकरणात व्यवस्थापक रफिक शेख, ज्योती भोसले, समुह संघटिका वैशाली सोनवणे यांनी साई इंडस्ट्रीअल ट्रेनिंग सेंटर या नावाने संस्था सुरु केली. एनयूएलएम योजनेतून प्रत्येकी 30 लाभार्थ्यांचे 45 हून अधिक शिबिरे घेतल्याचे दाखविले. प्रत्येक शिबिरामागे साडेचार लाख रुपयानूसार तीन वर्षात लाखो रुपयाचा अपहार केल्याचे दिसत आहे. या प्रकरणी सखोल चाैकशी करुन दोषी आढळल्यास फाैजदारी दाखल करावी, असे म्हटले आहे.

दरम्यान, सदरील प्रकरणाची आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी चाैकशीचे आदेश दिले आहे. त्या चाैकशी अहवाल एका महिन्यात सादर करण्याच्या सुचना केल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button