breaking-newsTOP Newsगणेशोत्सव-२०२३ताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रमहिला दिनमुंबईराजकारणराष्ट्रिय

शरद पवारांचा शिवसेना-शिंदे गटाला सल्ला ः दसरा मेळाव्यात एवढं एक पथ्य जरुर पाळा

पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

शिवसेना पक्षाची दोन शकलं झाल्यामुळे दोन्ही गटांमध्ये स्पर्धा आणि संघर्ष होणे स्वाभाविक आहे. पण हे सर्व करताना एक मर्यादा कायम ठेवा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवसेना आणि शिंदे गटाला दिला. एका पक्षाचे दोन भाग झाल्यामुळे ही स्पर्धा सुरु झाली आहे. दसरा मेळावा त्या सगळ्याचं सूत्र म्हणून स्वीकारला गेला आहे. गंमत म्हणजे अशा गोष्टी होतात, यात काही नवीन नाही. संघर्ष होतो पण त्याला मर्यादा असली पाहिजे. ती मर्यादा सोडून काही झाले तर ते चांगलं नाही. अशी परिस्थिती टाळण्यासाठी माझ्यासकट राज्यातील जबाबदार नेत्यांनी वातावरण नीट करण्यासाठी पावले टाकली पाहिजेत, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. ते सोमवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी शरद पवार यांनी जेष्ठत्वाच्या नात्याने शिवसेना आणि शिंदे गटाला एक सल्ला देऊ केला. मुख्यमंत्री हे फक्त पक्षाचे नव्हे तर संपूर्ण राज्यातील जनतेचे प्रमुख असतात. त्यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. दसरा मेळावा जरूर घ्यावा. पण यावेळी वातावरणात कटुता निर्माण होईल, अशी मांडणी भाषणांमधून होता कामा नये, अशी अपेक्षा दोन्ही बाजूंकडून आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला मदत करत असल्याच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. दसरा मेळावा हा शिवसेनेचा कार्यक्रम आहे. या सगळ्या गोष्टीत राष्ट्रवादी काँग्रेसचा काहीही संबंध नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

२०१४ साली शिवसेना युतीचा प्रस्ताव घेऊन काँग्रेसकडे आली होती. पण त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने परस्पर भाजपला पाठिंबा दिल्याने त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाले नाही, असा दावा अशोक चव्हाण यांनी केला होता. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेसला कोणीही असा प्रस्ताव दिला असता तर मला थोडीफार माहिती असती. राष्ट्रवादीत अन्य नेत्यांनाही निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. पण त्यांनी किमान ही गोष्ट माझ्या कानावर घातली असती. पण अशोक चव्हाणांनी असा काही प्रस्ताव दिल्याचे मी कधीचं ऐकलं नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.

अंधेरी पूर्व जागेसाठी पोटनिवडणूक होते आहे. भाजप आणि शिवसेनेत सामना होणार आहे, आपला पाठिंबा कुणाला, या पत्रकारांच्या प्रश्नांवर क्षणाचाही विलंब न लावता राष्ट्रवादीची ताकद आम्ही शिवसेनेच्या पाठीमागे उभी करु, असं उत्तर शरद पवार यांनी दिलं. महिनाभरावर आलेल्या निवडणुकीत अंधेरीपूर्व जागेवर आम्ही शिवसेनेला सहकार्य करु, अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

शरद पवारांचा शिवसेना-शिंदे गटाला सल्ला ः दसरा मेळाव्यात एवढं एक पथ्य जरुर पाळा

पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

शिवसेना पक्षाची दोन शकलं झाल्यामुळे दोन्ही गटांमध्ये स्पर्धा आणि संघर्ष होणे स्वाभाविक आहे. पण हे सर्व करताना एक मर्यादा कायम ठेवा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवसेना आणि शिंदे गटाला दिला. एका पक्षाचे दोन भाग झाल्यामुळे ही स्पर्धा सुरु झाली आहे. दसरा मेळावा (Dasara Melava) त्या सगळ्याचं सूत्र म्हणून स्वीकारला गेला आहे. गंमत म्हणजे अशा गोष्टी होतात, यात काही नवीन नाही. संघर्ष होतो पण त्याला मर्यादा असली पाहिजे. ती मर्यादा सोडून काही झाले तर ते चांगलं नाही. अशी परिस्थिती टाळण्यासाठी माझ्यासकट राज्यातील जबाबदार नेत्यांनी वातावरण नीट करण्यासाठी पावले टाकली पाहिजेत, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. ते सोमवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी शरद पवार यांनी जेष्ठत्वाच्या नात्याने शिवसेना आणि शिंदे गटाला एक सल्ला देऊ केला. मुख्यमंत्री हे फक्त पक्षाचे नव्हे तर संपूर्ण राज्यातील जनतेचे प्रमुख असतात. त्यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. दसरा मेळावा जरूर घ्यावा. पण यावेळी वातावरणात कटुता निर्माण होईल, अशी मांडणी भाषणांमधून होता कामा नये, अशी अपेक्षा दोन्ही बाजूंकडून आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला मदत करत असल्याच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. दसरा मेळावा हा शिवसेनेचा कार्यक्रम आहे. या सगळ्या गोष्टीत राष्ट्रवादी काँग्रेसचा काहीही संबंध नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

२०१४ साली शिवसेना युतीचा प्रस्ताव घेऊन काँग्रेसकडे आली होती. पण त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने परस्पर भाजपला पाठिंबा दिल्याने त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाले नाही, असा दावा अशोक चव्हाण यांनी केला होता. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेसला कोणीही असा प्रस्ताव दिला असता तर मला थोडीफार माहिती असती. राष्ट्रवादीत अन्य नेत्यांनाही निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. पण त्यांनी किमान ही गोष्ट माझ्या कानावर घातली असती. पण अशोक चव्हाणांनी असा काही प्रस्ताव दिल्याचे मी कधीचं ऐकलं नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.

अंधेरी पूर्व जागेसाठी पोटनिवडणूक होते आहे. भाजप आणि शिवसेनेत सामना होणार आहे, आपला पाठिंबा कुणाला, या पत्रकारांच्या प्रश्नांवर क्षणाचाही विलंब न लावता राष्ट्रवादीची ताकद आम्ही शिवसेनेच्या पाठीमागे उभी करु, असं उत्तर शरद पवार यांनी दिलं. महिनाभरावर आलेल्या निवडणुकीत अंधेरीपूर्व जागेवर आम्ही शिवसेनेला सहकार्य करु, अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button