आंतरराष्टीयपुणे

शिक्षक नानासाहेब सोलनकर यांची युनेस्को स्कूल क्लब आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड

पुणे|महाईन्यूज|प्रतिनिधी

युनेस्को स्कूल क्लब आयोजित 50 वा वर्धापन दिन व आंतरराष्ट्रीय परिषदे दिनांक 15 डिसेंबर ते 19 डिसेंबर रोजी मौचक युनेस्को क्लब दिब्रुगड आसाम येथे संपन्न होणार आहे. या परिषदेसाठी जगभरातुन 45 युनेस्को स्कूल क्लबचे मुख्य मार्गदर्शक उपस्थित राहणार आहेत.

ठाणे जिल्ह्यातील वेहळोली कातकवाडी येथील शिक्षक नानासाहेब महादेव सोलनकर यांची परिषदेसाठी भारतातून निवड झाली आहे. त्यांना युनेस्को स्कूल क्लबचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष धीरेंद्र भटनागर यांनी ई-मेल द्वारे कळविले आहे.

नानासाहेब सोलनकर यांनी ठाणे जिल्ह्यातील युनेस्को स्कूल क्लब स्थापन करणारी पहिली संस्था निर्माण केली आहे. त्यामुळे नानासाहेब सोलनकर यांची निवड करण्यात आली आहे. नानासाहेब सोलनकर हे मुळचे मंगळवेढा तालुक्यातील ब्रम्हपुरीचे रहिवासी आहेत. त्यांच्या उपक्रमाबद्दल व झालेल्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button