ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जखमी वासरु पालिकेच्या दारात सोडून बजरंग दलाचे आंदोलन

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रवेश दारावर जखमी वासरु सोडून बजरंग दलाने आंदोलन केलं. शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत मोकाट जनावरं, गायी, गुरांचा प्रश्न मांडण्यात आला. मात्र त्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही. त्याचमुळे निषेध नोंदवत बजरंग दलाने आंदोलन केले.

महापालिकेच्या प्रवेशद्वारावर जखमी वासराला ठेऊन बजरंग दलाने आंदोलन केले. वासराच्या जखमांवर मलमपट्टी केली होती.

गोमातेच्या संरक्षणासाठी निधी उपलब्ध होत नाही. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे अनेक वेळा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत गोरक्षणाबाबचा प्रश्न हाणून पाडला आहे. याच गोष्टीचा निषेध म्हणून आज अपघातग्रस्त झालेल्या वासराला पालिकेच्या प्रवेश द्वारावर आणण्यात आले होते. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button