breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांच्या हातात

2 केंद्रावरुन 276 शाळांना वाटप ः सुमारे 6 लाख 33 हजार विद्यार्थ्यांना लाभ

पिंपरी, – सर्व शिक्षा अभियानातंर्गत महापालिका शिक्षण मंडळाकडून चालू शैक्षणिक वर्षात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरणास प्रारंभ 5 जूनच्या दरम्यान करण्यात येणार आहे. शिक्षण मंडळाने पिंपरी व आकुर्डीच्या उन्नत समूह साधन केंद्रावरुन 276 महापालिका शाळा, खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित शाळांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार असून, यामध्ये 6 लाख 33 हजार 276 विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हाती वेळीच पुस्तके मिळणार आहे.

15 जूनपासुन नवीन शैक्षणिक वर्षे सुरु होणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ मिळावा, कोणीही विद्यार्थी पाठ्यपुस्तकांपासून वंचित राहु नये. याकरिता शिक्षण मंडळाने पाठ्यपुस्तक वाटपास प्रारंभ करणार आहे. सर्व शिक्षा अभियानातंर्गत सन 2018-19 मध्ये इयत्ता पाहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरण करण्यात येणार आहे. दोन उन्नत केंद्राचे 20 विभाग करण्यात आले आहेत. या केंद्रावर साधारणपणे 5 ते 10 जूनपर्यंत सकाळी 10 ते 5 यावेळेत होणार आहे.

महापालिका कार्यक्षेत्रातील पिंपरी व आकुर्डी उन्नत समुह केंद्रातून बालभारती भांडार पुणे यांच्याकडून पुरवठा करण्यात आलेल्या पुस्तकांचे वाटप होणार आहे. महापालिकेच्या पात्र शाळासाठी उन्नत समुह साधन केंद्रनिहाय पाठ्यपुस्तके प्राप्त झालेली आहेत. त्यानुसार पिंपरी केंद्रात याठिकाणी सर्व पाठ्यपुस्तके मुख्याध्यापकांना दिली जाणार आहेत.  प्रत्येक शाळांच्या मुख्याध्यापकांने शाळा व्यवस्थापन कमिटीच्या अध्यक्ष व सदस्यांच्या उपस्थितीत पाठ्यपुस्तकांचे वाटप करावे लागणार आहे. पाठ्यपुस्तके वाटपासाठी प्रत्येक केंद्रावर दोन नियंत्रण अधिकारी, विषय तज्ञ, कर्मचारी असा 10 जणांची नियुक्‍ती केलेली आहे. यावेळी पात्र शाळांच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थी संख्या घेवून यावे, त्यानंतरच पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत, असे आवाहन शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी बी.एस.आवारी यांनी केले आहे.

मुख्याध्यापकांवर पुस्तकांची जबाबदारी
सर्व शिक्षा अभियानातून पात्र शाळांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार आहे. ही पुस्तके घेवून जाण्यासाठी मुख्याध्यापकांनी, जबाबदार शिक्षक, भाड्याने वाहन व मदतनिस कर्मचारी घेवून यावे, तसेच, चालू वर्षाची संच मान्यतेची प्रत, सन 2017-18 मधील युडायस पटाप्रमाणे पाठ्यपुस्तकची मागणीपत्र, नियोजित वेळापत्रकानुसार पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येणार असून, वेळेवर पाठ्यपुस्तके प्राप्त करुन न घेतल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची राहणार आहे, असेही शिक्षण मंडळाने मुख्याध्यापकांना सुनावले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button