breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९,४३,७७२ वर

  • मुंबईत १,३४६, पुणे शहरात १,८८० नवे रुग्ण

मुंबई – राज्यात सोमवारचा अपवाद वगळता सलग तीन दिवस २० हजारांवर नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. मंगळवारी पुन्हा एकदा या आकड्याने उसळी घेतली. काल दिवसभरात राज्यात तब्बल २० हजार १३१ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर ३८० रुग्णांनी आपला जीव गमावला. तसेच दिवसभरात ७२ हजार ५५६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ९ लाख ४३ हजार ७७२ वर पोहोचली आहे. यापैकी २ लाख ४३ हजार ४४६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत ६ लाख ७२ हजार ५५६ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून २७ हजार ४०७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मंगळवारी १ हजार ३४६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर ४२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यासह मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता १ लाख ५८ हजार ७५६ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा ७ हजार ९३९ इतका झाला आहे. दिलासादायक म्हणजे मुंबईत आतापर्यंत १ लाख २५ हजार ९०६ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर सध्या २४ हजार ५५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दररोज मोठ्या संख्येने रुग्णवाढ होणाऱ्या पुणे शहरात मंगळवारी कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण अधिक आढळून आले. पुणे शहरात मंगळवारी २ हजार २२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले, तर १ हजार ८८० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तसेच ४८ रुग्णांचा मृत्यू झाला. यासह शहरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ९ हजार ८३८ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ९० हजार ६०१ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून २ हजार ५८४ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. दरम्यान, पुणे शहरात सध्या १६ हजार ६५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button