breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरातील आणखी एका नर्सला कोरोनाचा संसर्ग, एकूण रुग्णांची संख्या ३१

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात राहणाऱ्या परंतु पुण्यातील एका नामांकित रुग्णालयात नोकरी करणा-या आणखी एका नर्सला कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे. आता शहरातील रुग्णांची संख्या 31 झाली असून या पार्श्वभूमीवर महापालिकेने आज रात्री 11 वाजल्यापासून संभाजीनगर, दिघीरोड भोसरी, गव्हाणे वस्ती हा परिसर पुढील आदेशापर्यंत सील केला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात ही नर्स वास्तव्याला आहे. ती पुण्यातील एका नामांकित रुग्णालयात नोकरी करते. ही नर्स काही दिवसांपासून रुग्णालयातच वास्तव्याला होती. या नर्सचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे तिला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वी शहरात राहणा-या आणि पुण्यातील खासगी रुग्णालयात नोकरीला असलेल्या एका नर्सला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.

पिंपरी- चिंचवड शहरातील 44 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 12 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना बाधित सक्रिय 31 रुग्ण शहरात आहेत. त्यातील 27 रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, चार सक्रिय कोरोना बाधित रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रविवारी (दि . 9) एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, काल रात्री पॉझिटीव्ह आलेले सहा रुग्ण आणि आजची पॉझिटीव्ह आलेली नर्स खराळवाडी, दिघीरोड भोसरी, गव्हाणे वस्ती आणि संभाजीनगर परिसरातील आहेत.

त्यामुळे गव्हाणे वस्ती, संभाजीनगर हा भाग आज रात्री 11 वाजल्यापासून सील केला आहे. खराळवाडी परिसर यापुर्वीच सील केला आहे. या परिसराच्या हद्दींमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी आणि परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button