breaking-newsताज्या घडामोडीपुणे

दौंड तालुक्यात अवैध व्यवसायिकांनी डोके वर काढले; गुन्हे शाखेकडून एकास अटक

पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी

एकीकडे देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत चालला असतानाच दुसरीकडे दौंड तालुक्यात अवैध व्यवसायिकांनी चांगलेच डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली तेलंगणा ते मुंबई अशी अवैद्यपणे गुटखा पोत्यांची वाहतूक करणाऱ्या दोन परप्रांतीय आरोपींवर बारामती गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हा दाखल केला असुन एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.

मध्यरात्रीच्या दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक यांचे पथक कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस टोल नाका येथे गस्त घालीत असताना एका टेम्पो बद्दल संशय आला. पोलिसांनी चालकास विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर पोलीस पथकाने गाडीची तपासणी केली असता खाण्याच्या बिस्कीटांचे बॉक्सच्या आड सागर नावाचा गुटखा लपविला असल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आले. जप्त करण्यात आलेल्या गुटख्याची किंमत 22 लाख 27 हजार एवढी आहे. पोलीस पथकाने टेम्पोसह एका व्यक्तींला ताब्यात घेऊन यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button