breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विशाल बाणे युवा मंचच्या वतीने टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी जाधव यांचा वाढदिवस साजरा

पिंपरी / महाईन्यूज

टायगर ग्रुपचे अध्यक्ष पैलवान तानाजी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त अनिकेत घुले यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल बाणे यांच्या वतीने गरजू लोकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. तसेच, मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून समाजाला पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. याशिवाय, आर्थिक हालाकीची परिस्थिती असणा-या विद्यार्थ्यांना कॉम्पुटर वाटप करण्यात आले. बाणे यांच्या सामाजिक उपक्रमामुळे तरुणांपुढे एक आदर्श निर्माण झाला आहे.

पै. तानाजी जाधव यांचा वाढदिवस दरवर्षी थाटात साजरा केला जातो. सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जातो. त्यामध्ये दिनदुबळ्यांना आर्थिक मदत, गरजुंना वेगवेगळ्या प्रकारची मदत केली जाते. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून तानाजी जाधव यांनी साध्या पध्दतीने व सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यामध्ये समाजातील विविध घटकाला सहभागी करून घेण्याचे विशेष आवाहन केले होते.

निगडीतील विशाल भाऊ बाणे युवा मंचच्या वतीने विद्यार्थ्यांना, गरजुंना साहित्य व अन्नधान्य वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. या उपक्रमामुळे तरुणांपुढे एक आदर्श निर्माण झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button