breaking-newsपिंपरी / चिंचवड

पडळरांनी आत्मपरीक्षण करावे…डिपॉझिट जप्त झाली होती विसरु नये : नगरसेविका मंगला कदम

पिंपरी : भाजपचे  आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार साहेबांवर आज जे वक्तव्य केलेले आहे. हे त्यांच अज्ञान आहे त्यांना भाजपाने विधान परीषदेची आमदारकी दिली याचा अर्थ  उचली जीभ लावली टाळ्याला याच्यासाठी दिली नाही. यश हे माणसाला पचवता आले पाहिजे आमदारकी मिळाली म्हणजे काही बोलायला दिली  अस नाही. ज्यावेळेला डिपॉझीट जप्त झाल होते. त्यांच्यानंतर आमदारकी मिळाल्यानंतर आज यांना हे सुचतय, अशी टीका नगरसेविका मंगला कदम यांनी केली आहे.

तसेच,  ज्या पवार साहेबांना  महाराष्ट्राचे दैवत महाराष्ट्राचे जनता मानते त्या पवार साहेबांवर बोलण्याची   स्वत:ची लायकी तरी आहे का ? आमदारकी मिळाली म्हणून  वाटेल ते बरळाव का ? याच जरा आत्मपरीक्षण पडवळकरांनी कराव  एखाद्या व्यक्ती बद्दल इतक्या खालच्या पातळीवर येऊन वक्तव्य करणे हिच भारतीय जनता पार्टीच्या संस्कृती आहे का ? असा प्रश्नही कदम यांनी उपस्थित केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button