breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आरोग्य विभागाचे कागदी घोडे ; घनकचरा व्यवस्थापन नियमांचे नागरिकांकडून उल्लंघन

आरोग्य कार्यकारी अधिका-यांचे दुर्लक्ष, दंडात्मक कारवाई शून्य 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरातील शासकीय, निमशासकीय कार्यालये, विविध संस्था, कंपन्यासह नागरिकांकडून घनकचरा व्यवस्थापन नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. शहरात अनेक नागरिक रस्ते , मार्गावर घाण करु लागलेत, सार्वजनिक ठिकाणी थुंकू लागलेत, उघड्यावर लघुशंका करीत असून उघड्यावर शाैचालाही जात आहेत. याकडे महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आरोग्य अधिका-याकडून दंडात्मक करावी करण्यात येत नाही. पालिकेच्या आरोग्य विभागाने घनकचरा व्यवस्थापन नियमांची प्रभावी अमंलबजावणी न केल्याने नागरिक त्या नियमांचे उल्लंघन करु लागले आहेत. याकडे आरोग्य कार्यकारी अधिका-यांचेही दुर्लक्ष झाल्याने शहर अस्वच्छतेचे बोजबारा वाजला आहे.  

अविघटनशील कच-यामुळे स्वच्छ भारत अभियानाच्या अमंलबजावणीवर अनिष्ठ परिणाम होवू लागल्याने महाराष्ट्र प्लाॅस्टीक व थर्माेकोल अविघटनशील वस्तूंचे उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक बंदी घालण्यात आली. तसेच पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय आदेशानूसार घनकचरा व्यवस्थापन नियम लागू केले आहेत. या नियमांची पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात प्रभावीपणे अंमलबजावणी झालेली नाही.

शासनाने घनकचरा व्यवस्थापन नियम आणि 2016 च्या तरतुदीचे अनुपालन न करणा-या व्यक्ती अथवा संस्थाना दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार महानगरपालिकांना 30 डिसेंबर 2017 अन्वये प्रदान केले आहेत. मात्र, महापालिकेच्या कार्यक्षेत्रात सदरील नियम व तरतुदींचे सर्रास उल्लंघन करुनही नागरिकांसह संस्थावर दंडात्मक कारवाई होताना दिसत नाही. यामध्ये रस्ते, मार्गावर घाण करणे ( दंड 180 रुपये), सार्वजनिक ठिकाणी थुंकणे ( दंड 150 रुपये), उघड्यावर लघुशंका करणे (दंड 200 रुपये), उघड्यावर शाैच करणे ( दंड 500 रुपये) याबाबत आरोग्य विभागाकडून दंडात्मक कारवाई होताना दिसत नाही.

तसेच प्रत्येक कचरा निर्मात्याने (नागरिकांनी) विघटनशील – कुजणारा किंवा आेला, अविघटनशील – न कुजणारा किंवा सुका आणि घरगुती धोकादायक असा वर्गीकृत केलेला कचरा स्वतंत्रपणे देवून स्थानिक स्वराज्य संस्थेने नेमुण दिलेल्या व्यक्तीकडे देणे बंधनकारक आहे. या देखील नियमांची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन नियम व 2016 मधील तरतुदीचे अनुपालन करण्यात येत नसल्याने केवळ कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार आरोग्य विभागातील अधिका-यांकडून सुरु आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button