breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मैलामिश्रित पाणी थेट नदी पात्रात ; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पिंपरी – सांगवी, पिंपळे गुरव परिसरातील मैलावाहिन्यांचे चेंबर जुने व कमकुवत झाले आहे. या मुधन गळती होवुन मैलामिश्रित पाणी नदी पात्रात मिसळत आहे.  सांगवी मुळा नदी पात्रावरील मैलाशुद्धिकरण पंपिंग स्टेशन शेजारी दोन चेंबर फुटल्याने त्यातील मैलामिश्रित पाणी थेट नदीपात्रात जात आहे. त्यामुळे नागरीकांच्या आरोग्याला धोका पोहोचला आहे.

याबाबत मनसेचे राजु सावळे यांनी महापालिका संबंधित विभाग व ठेकेदारांवर कारवाईची पर्यावरण विभागाकडे मागणी केली आहे. सांगवी परिसरात दोन चेंबर फुटल्याने मैलामिश्रित पाणी थेट नदीच्या पाण्यात मिसळत आहे. आधीच प्रदुषित असलेल्या नद्यांमधुन हे मैलामिश्रित पाणी थेट मिसळत असल्याने नदीप्रुदुषणात भर पडत आहे. उरल्या सुरल्या जलचरांनाही यामुळे धोका निर्माण झाला आहे. तर नदीकिनारा भागातील रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत पालिका मलनिस्सारण विभागाकडुन दुर्लक्ष होत असल्याचे येथील रहिवाशी सांगतात.गेली पंधरा दिवसांपासुन अहोरात्र हे मैलापाणी थेट नदीपात्रात जात आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या मैलाशुद्धीकरण केंद्राचा उपयोग काय ? असा सवाल नागरीक विचारत आहेत. सध्या पावसालाही सुरूवात झाल्याने दुर्गंधी बरोबर रहिवाशांना साथीच्या आजारांचा धोका संभवतो.

मुळा नदीपात्रालगत गेल्या काही दिवसापासून स्थापत्य विभागामार्फत रिटेनिंग वॉलचे काम सुरु आहे. जिथे काम सुरु आहे, त्याच्या बाजूलाच या मैलावाहिन्या लाईन आहेत. येथील दोन चेंबर मधुन दररोज लाखो लिटर मैलायुक्त पाणी दापोडी येथील मैलापाणी शुद्धीकरण केंद्रात जात असते. मात्र, संपूर्ण क्षमतेने हे पाणी तिथपर्यंत जात नाही. या ड्रेनेज लाईन गेल्या वर्षभरापासून लिकेज असल्याचे येथील नागरीक सांगतात. तर मलनिस्सारण स्थापत्य विभागाकडुन येथील चेंबर वारंवार दुरूस्ती केल्याचे सांगण्यात आले. कुणीतरी खोडसाळपणाने येथील चेंबर फोडत असल्याची तक्रार पालिका कनिष्ठ अभियंत्या प्रिती गाडे यांनी सांगवी पोलिसात दाखल करण्यात आली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button