breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महिलांवरील अत्याचार कदापि खपवून घेतले जाणार नाही : खासदार डॉ. अमोल कोल्हे

पुणे |महाईन्यूज|

शिरूर तालुक्यात विनयभंगाला विरोध करणाऱ्या महिलेचे डोळे निकामी करण्यात आल्याची गंभीर घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. माणुसकीला काळिमा फासणारे हे दुष्कृत्य आहे. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. महिलांवरील अत्याचार कदापि खपवून घेतले जाणार नाही. तसेच असे कृत्य करणाऱ्यांना जरब बसावी यासाठी कठोरात कठोर शिक्षा व्हावी असाच आमचा आहे. फक्त या गंभीर घटनेमध्ये कसल्याही प्रकारचे राजकारण आणू नये , असे मत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले आहे.

शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे विनयभंगाला विरोध करणाऱ्या महिलेचे डोळे निकामी करण्यात आल्याची गंभीर घटना घडली होती. या घटनेतील गंभीर जखमी महिलेवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहे. महिलेच्या कुटुंबियांची अमोल कोल्हे यांनी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित होत्या.

कोल्हे म्हणाले, या दुर्दैवी घटनेत महिलेचे दोन्ही डोळे निकामी झाले आहेत. ते पूर्ववत होण्याची शक्यता कमी दिसतेय. पण या महिलेचे पुढे योग्य पुनर्वसन करण्यासाठी सर्व सहकार्य केले जाईल. माझ्या मतदारसंघातील घटना आहे. त्यामुळे या घटनेचा मी सातत्याने आढावा घेत आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button