breaking-newsपिंपरी / चिंचवड

विमा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार रनजीत वडने यांना प्रदान

पिंपरी / महाईन्यूज

जागतिक स्तरावर विमा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या विमा प्रतिनिधींना दिला जाणारा (एमडीआरटी – अमेरिका 2020) या वर्षीचा पुरस्कार एलआयसी विमा प्रतिनिधी रणजीत वडने यांना प्रदान करण्यात आला. जूनमध्ये अमेरिकेत होणा-या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी त्यांची निवड झाली आहे.

प्रतिनिधी रणजीत वडने यांनी 2020 मध्ये एलआयसी या भारत अंगीकृत विमा संस्थेमध्ये उत्कृष्ट कार्य करून विमा क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा पुरस्कार प्राप्त केला आहे. यासाठी त्यांना विकास अधिकारी प्रशांत बोठे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

कोरोनाच्या संकट काळामध्ये शहरी तसेच ग्रामीण भागातही अनेक कुटुंब विमा संरक्षित करण्याचे काम ते करत आहेत. एक उत्कृष्ट आर्थिक सल्लागार म्हणून देखील ते परिचित आहेत. त्यांनी आजपर्यंत 700 पेक्षा अधिक कुटुंबांना विमा संरक्षित केला आहे. ग्राहकांचे योग्य आर्थिक नियोजन म्हणजे निवृत्तीकरिता पेन्शन योजना, मुला-मुलींसाठी शिक्षण व विवाहासाठीच्या पैशाचे नियोजन, टॅक्स फायलींग आदी करून दिले आहे. तसेच, जुन्या एलआयसी पॉलिसीवर देखील ते मोफत सेवा देतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button