breaking-newsमनोरंजनराष्ट्रिय

मद्यधुंद टीव्ही अभिनेत्रीचा धिंगाणा; पोलिसांना मारहाण

टीव्ही अभिनेत्री रुही शैलेशकुमार सिंहने सोमवारी रात्री दारुच्या नशेत वांद्रे येथील एका रेस्टॉरंटबाहेर धिंगाणा घातला. मद्यधुंद रुहीने रेस्टॉरंटबाहेर उभ्या असलेल्या सात गाड्यांना धडक दिली तसंच पोलीस कॉन्स्टेबलचा मोबाइल हिसकावला आणि त्याच्या कानशिलात लगावली. याप्रकरणी रुही सिंह आणि तिच्यासोबत असलेल्या मित्रांविरोधात मद्यपान करून गाडी चालवणे, पोलिसांना धक्काबुक्की करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रुही आणि तिचे दोन मित्र सोमवारी रात्री उशिरा एका पार्टीवरून घरी परतत होते. दरम्यान एका मित्राला लघुशंकेसाठी त्यांनी वांद्रे इथल्या एका रेस्टॉरंटजवळ गाडी थांबवली. तिथल्या कर्मचाऱ्यांनी रेस्टॉरंट बंद झाल्याचं रुहीला सांगितलं. पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. रेस्टॉरंटचे कर्मचारी आणि रुहीचे मित्र यांच्यात बाचाबाची झाली. त्यादरम्यान तिथल्या एका सुरक्षारक्षकाने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली.

ANI

@ANI

Mumbai: A case has been registered against TV Actor Ruhi Singh & 2 others after she allegedly assaulted a police personnel at Linking Road, Bandra before fleeing in her car, in an inebriated state, & meeting with an accident at Santacruz. Incident took place on night of 31 March.

५२ लोक याविषयी बोलत आहेत

पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर रुही आणि रेस्टॉरंटचे कर्मचारी यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र मद्यधुंद रुहीने पोलिसांनाच धक्काबुक्की केली. या धक्काबुक्कीचा व्हिडिओ बनवला जात असताना रुहीने संबंधित कॉन्स्टेबलचा मोबाइल हिसकावला आणि त्याच्या कानशिलात लगावली. ती इथेच थांबली नाही तर गाडीने रेस्टॉरंटच्या बाहेर उभ्या असलेल्या सात गाड्यांनाही धडक दिली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button