breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

विभागीय आयुक्तांचे नगरसचिव विभागाकडे पत्र ; राष्ट्रवादी गटनेते पदाचा दत्ता साने उद्या घेणार पदभार

पिंपरी –  महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेते पदी ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांची नेमणूक करण्यात आली. पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे नोंदणी केल्याने त्यांचे पत्र आज (बुधवार दि.16 ) महापालिका नगरसचिव कार्यालयास प्राप्त झाले आहे. तसेच महापाैर नितीन काळजे यांच्याकडेही पत्र पाठविण्यात आले आहे. त्यामुळे उद्या (गुरुवारी) दुपारी तीन वाजता गटनेते पदाचा अधिकृत पदभार दत्ता साने  हे अधिकृतपणे स्विकारणार आहेत.

चिखली प्रभागातून सलग तिसऱ्यांदा नगरसेवक पदावर दत्ता साने विजयी झाले आहेत. आक्रमक नगरसेवक म्हणून ते परिचित आहेत. आगामी काळात भोसरी विधानसभा मतदारसंघातून “राष्ट्रवादी’च्या वतीने रिंगणात उतरण्याची त्यांची तयारी करत होते. परंतू, त्या अगोदरच त्यांना विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. साने म्हणाले, “”सत्ताधारी भाजपच्या काळात वाढलेल्या भ्रष्टाचाराचा भंडाफोड करणे, हाच मुख्य माझा अजेंडा असेल. राष्ट्रवादीवर नाहक आरोप करून बदनाम करणारा भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आणू.” असेही ते म्हणाले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button