breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वायसीएमच्या सिटी स्कॅन विभागात एसीचा शाॅर्ट सर्किटमुळे आग

पिंपरी – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात सिटी स्कॅन मशीनच्या विभागात एसीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. ही घटना आज (बुधवारी) पाचच्या सुमारास घडली. या घटनेत फक्त एसीने पेट घेतल्याने तो जळून खाक झाला. इतर कोणतीही हानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सिटी स्कॅन मशीनमध्ये तपासणी केली जात होती. अचानक पाच वाजण्याच्या सुमारास एसीमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. त्याचवेळी मशीनमध्ये रुग्णाला तपासणीसाठी ठेवण्यात येत होते. मशीन चालविणाऱ्या तज्ज्ञांच्या प्रसंगावधानतेमुळे तात्काळ पेशंटला तेथून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे इतर धोका टळला आहे. तेथील अग्निशमन साहित्याच्या सहाय्याने एसीला लागलेली आग तातडीने विझविण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button