breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

हिरवगार विड्याचं पान खाण्याचे असंख्य फायदे

हिरवगार विड्याचं पान अनेकांचं लक्ष वेधून घेत असतं. या पाणाच्या सुगंधाने देखील मन प्रसन्न होत. मात्र या पानांचा केवळ खाण्यासाठीच नाही तर ईतरही अनेक फायदे आहेत. त्यामुळे विड्याचं पान खाण्याचे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

१. विड्याचं पान खाल्ल्यामुळे भूक वाढते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यापूर्वी काळ्या मिरीसोबत विड्याचं पान खाल्यास भूक वाढते. मात्र मिरी आणि पान दोन्ही उष्ण असल्यामुळे याचं प्रमाण मोजून घ्यावं.

२. सतत डोकेदुखीने त्रस्त असणाऱ्यांसाठी विड्याचं पान वरदान आहे. या पानांचा रस कपाळाला लावल्यास डोकेदुखी थांबते.

३. विड्याच्या पानांचं रस एखाद्या जखमेवर लावल्यास जखम लवकर भरते. तसंच अंगावर कुठेही फोड किंवा गळू झाल्यास त्यावर विड्याचं पान गरम करुन त्यावर एरंडेल तेल लावून हे पान फोड झालेल्या ठिकाणी लावावं.

४. विड्याच्या पानामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

५. सर्दी किंवा खोकला झाल्यास विड्याच्या पानासोबत मध खावं.

६.विड्याच्या पानामुळे चेहऱ्यावरील डाग,मुरूम दूर होतात. यासाठी ५ ते ६ विड्याची पानं वाटून १ ग्लास पाण्यात मिक्स करा. त्यानंतर हे पाणी आटवून त्याचा तयार फेसपॅक चेहऱ्यावर लावा.

७. विड्याच्या पानामुळे पचनशक्ती सुधारते.

८. विड्यांचा पानांचा लेप हा केसांसाठीही अत्यंत उपयुक्त असतो. त्याने केसं मजबूत होण्यास मदत होते तर, केसांना एक वेगळी चमकही येते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button