breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका वैद्यकीय विभागात कोरोनाचा शिरकाव; एक महिला कर्मचारी ‘पाॅझिटिव्ह’

वैद्यकीयतील अन्य कर्मचा-यांच्या आज जिजामाता रुग्णालयात घेतले स्वॅब

पिंपरी |महाईन्यूज |प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील एका महिला कर्मचा-याचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला आहे. त्यामुळे अन्य कर्मचा-यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. त्या सर्व कर्मचा-यांचे आज (सोमवारी) जिजामाता रुग्णालयात कोरोना तपासणीस स्वॅब घेण्यात आले असून अन्य कर्मचा-यांनी सुरक्षेच्या योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन डाॅ. पवन साळवे यांनी केले.

पिंपरी चिंचवड शहरात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. लाॅकडाऊन काळात शहरातील कोरोना स्थिती नियंत्रणात होती मात्र, लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर शहरात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोना रुग्णांचा उद्रेक वाढल्याने सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे. रुग्णांची संख्या वाढू लागल्याने 8 जूलैपर्यंत महापालिकेत नागरिकांना व ठेकेदारांना प्रवेश बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच महापालिकेच्या आभियांत्रिकी विभागातील एका कर्मचा-याला कोरोना बाधित आढळून आला होता.

दरम्यान, महापालिका वैद्यकीय विभागातील कर्मचा-यांना अत्यावश्यक सेवेत कामकाज करावे लागत आहे. त्या सर्व कर्मचा-यांनी लाॅकडाऊन काळात देखील तत्परतेने काम करीत होते. मात्र, वैद्यकीय विभागातील एका महिला कर्मचा-यास कोरोनाची लागण झाल्याने अन्य कर्मचा-यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या सर्व कर्मचा-यांची जिजामाता कोविड रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्या सर्व कर्मचा-यांनी योग्य ती खबरदारी घेवून कामकाज करावे, असेही डाॅ. साळवे यांनी आवाहन केले आहे.

‘ड्रायव्हर’ही कोरोना पाॅझिटिव्ह

महापालिकेचे अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डाॅ. पवन साळवे यांच्या पालिकेतील कार्यरत वाहनचालक देखील कोरोना पाॅझिटिव्ह आले आहेत. त्या वाहनचालकास कोणतीही लक्षणे नव्हती. मात्र, ड्रिसेंट्री लागल्याने त्यांनी कोरोना टेस्ट करुन घेतली. त्यानंतर त्याचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला आहे. त्या वाहनचालकांच्या संर्पकातील अन्य कर्मचा-यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button