breaking-newsताज्या घडामोडीपुणे

विद्यार्थ्यांना मास्कची सक्ती नको; जनजागृती करण्याच्या सुचना

पुणे |महाईन्यूज|

पुण्यात करोना विषाणूचे दोन संशयित रुग्ण आढळले असले तरी शिक्षण आयुक्तांनी मात्र शाळेतील विद्यार्थ्यांना मास्क घालून येण्याची सक्ती न करण्याचं आवाहन केलं आहे. विद्यार्थ्यांना मास्क घालून येण्याची सक्ती करण्याऐवजी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी एक पत्रक काढून शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षकांना हे आवाहन केलं आहे. करोना व्हायरसबाबत जनजागृती करा. विद्यार्थ्यांना श्वसनासंबंधीचे शिष्टाचार पाळायला सांगा. वारंवार हात धुणे, शिंकताना, खोकताना रुमाल किंवा टिश्श्यू पेपरचा वापर करणे, आजारी असताना शाळेत न येणे, सार्वजनिक आणि गर्दीच्या ठिकाणी न जाणे आणि नाक व तोंडाला वारंवार हात न लावणे आदींबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी.

तसेच आजारी व्यक्तींपासून एक मीटर दूर राहण्याच्या सूचनाही विद्यार्थ्यांना करा. मात्र सद्यस्थितीत विद्यार्थ्यांना शाळेत येताना मास्क लावून येण्याची सक्ती करू नयेत, अशा सूचनाही सोळंकी यांनी दिल्या आहेत. करोना हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याला रोखण्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहनही सर्व शाळांना करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button