breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
शिल्पा शेट्टीला चढली भांगेची नशा,भांगेच्या नशेत नागिन डान्स
देशभरात आज होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आणि होळी म्हटलं की भांग आलीचं…भांगेचे सेवन केल्यानंतर एक प्रकारची नशा चढते, आणि या नशेच्या धुंदीत लोक चित्रविचित्र प्रकारे नाचू लागतात. अशीच नशा शिल्पा शेट्टीलाही चढली आहे…भांगेच्या नशेत नागिन डान्स करणाऱ्या शिल्पाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरादार व्हायरल होत आहे.
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याने एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्या देण्यासाठी त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये शिल्पा हनी सिंगच्या ‘नागिण’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. “दोन घोट भांग प्यायल्याचा परिणाम…” असे स्टेटस या व्हिडीओवर राज कुंद्राने लिहिले आहे.