breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदर्भात राष्ट्रवादीला धक्का, इंद्रनील नाईक शिवसेनेत प्रवेश करणार

यवतमाळ- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मनोहर नाईक (Manohar Naik) यांचे चिरंजीव इंद्रनील नाईक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे विदर्भातही राष्ट्रवादीला मोठा फटका बसणार आहे.

राष्ट्रवादीचे विदर्भातील एकमेव आमदार मनोहर नाईक यांचा चिरंजीव शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडणार आहे. उद्या (30 जुलै) इंद्रनील नाईक शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीनंतर इंद्रनील नाईक यांचा शिवसेना पक्ष प्रवेशाचा मुहूर्त ठरणार असल्याचे सांगितलं जात आहे. इंद्रनील नाईक यांच्या शिवसेना प्रवेशाने राष्ट्रवादीला विदर्भात मोठा फटका बसू शकतो. नाईक परिवाराची जिल्ह्यात मोठी ताकद आहे. इंद्रनील नाईक यांच्यासह 10 जिल्हा परिषद सदस्य, पुसन नगर परिषद यासह सर्व क्षेत्रातील कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलाय. नाईक परिवार राष्ट्रवादीशी एकनिष्ठ मानला जातो. दिवंगत माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचं हे घराणं आहे. पण या विधानसभेला इंद्रनील नाईक यांनी दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतलाय. राष्ट्रवादी सोडणार असून शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यामुळे नाईक यांना या मतदारसंघातून तिकीट मिळू शकते, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

विदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला भगदाड

विदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं भगदाड पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विदर्भातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आजी माजी आमदार भाजपच्या संपर्कात असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे माजी मंत्रीही भाजपच्या संपर्कात आहेत, अशी माहिती भाजप प्रवक्ते आमदार गिरीश व्यास यांनी दिली.

मनोहर नाईक कोण आहेत?

मनोहर नाईक हे प्रत्येक सरकारमध्ये मंत्री होते. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचं हे घराणं आहे. इंद्रनील नाईक हे सुधाकरराव नाईक यांचे पुतणे आहेत. पुसदमध्ये आजपर्यंत राष्ट्रवादीला कधीच खिंडार नव्हती. गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत मनोहर नाईक यांचे पुतणे निलय नाईक यांना भाजपने विधान परिषदेची उमेदवारी दिली आणि जिल्हा परिषदही भाजपला जिंकून दिली. पण बालेकिल्ला हातचा जाऊ नये यासाठी इंद्रनील नाईक यांनाच भाजप किंवा शिवसेनेत पाठवण्याचा मनोहर नाईक यांचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button