breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

तळेगावच्या स्वामी समर्थ पालखी सोहळ्यात खासदार बारणे यांचा सहभाग

तळेगाव दाभाडे | तळेगाव स्टेशन येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) आयोजित श्री स्वामी समर्थ प्रकट दिन व पालखी सोहळ्यात मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी-आरपीआय-रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे सहभागी झाले. यावेळी स्वामी भक्तांबरोबर खासदार बारणे यांनीही स्वामींच्या पालखीला खांदा देत स्वामी सेवा केली.

कार्यक्रमाच्या मुख्य संयोजिका व सिद्धिविनायक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सारिकाताई गणेश काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश काकडे यांनी खासदार बारणे यांचे स्वागत व सत्कार केला. त्यावेळी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे कार्यवाह संतोष खांडगे, माजी नगरसेवक निखिल भगत तसेच राजेंद्र दाभाडे, कल्पेश भगत, आशिष खांडगे, सुनील दाभाडे, सुनील मोरे, जयदीप पिल्ले, सुदेश मोरे, धीरज सावंत, दीपक कारके आधी प्रमुख पदाधिकारी व स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा    –    ‘त्याग, आदर्शाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे क्रांतिसूर्य महात्मा फुले’; संजोग वाघेरे पाटील 

स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सप्तशृंगी मंदिर, इंद्रायणी कॉलनी, आनंदनगर, मोहननगर, वनश्रीनगर मार्गे पालखी स्वामी समर्थ मंदिरात आली. पालखी मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. ढोल ताशांचा दणदणाट आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे मिरवणुकीत चांगलीच रंगत भरली. स्वामी भक्तांबरोबरच खासदार बारणे यांनीही पालखीला खांदा देत सेवा केली. खासदार बारणे यांच्या हस्ते स्वामींची आरती करण्यात आली. सर्व स्वामी भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button