breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

वारली चित्रकलेचे जनक जिव्या मशे यांचे निधन

पालघर – वारली चित्रकलेचे जनक जिव्या सोमा मशे यांनी गंजाड येथील निवासस्थानी अखेरचा श्‍वास घेतला. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्‍यात आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला. मशे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी पाड्यांवरील ही कला सातासमुद्रापार पोहोचविण्यात मशे यांचा सिंहाचा वाटा होता. डहाणू तालुक्‍यात गंजाड गावातल्या कलमी या आदिवासी पाड्यात 13 मार्च, 1931 रोजी जिव्या सोमा मशे यांचा जन्म झाला. ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी पाड्यावरील बायका लग्नसमारंभात आपल्या घराच्या भिंतींवर वारली चित्रे काढायच्या.
तारप्याभोवती फेर धरुन होणारा नाच, लग्नाचा मांडव, लग्नाचा चौक अशा असंख्य चित्रांचे मशे यांना लहानपणापासूनच आकर्षण वाटायचे. त्यामुळेच वारली चित्रे फक्त सुवासिनींनीच काढायची ही आदिवासींची प्रथा वयाच्या तेराव्या वर्षी मशे यांनी मोडली. त्यानंतर वारली चित्रकलेच्या दुनियेत मशे यांनी सुरु केलेली मुशाफिरी गेली 66 वर्ष अव्याहतपणे सुरु आहे.
भारतातील आदिवासी कला जगासमोर याव्यात आणि त्यांच्या कलात्मक वस्तूंना बाजारपेठ मिळावी यासाठी 1975 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशभरात एक शोध मोहीम राबविली होती. त्या मोहिमेतील भास्कर कुलकर्णी यांना जिव्या सोमा मशे हा अस्सल हिरा सापडला आणि मशे यांच्यासह वारली चित्र संस्कृतीचेही नशीब पालटले.

मशे आपली कला सादर करण्यासाठी दिल्लीत पोहोचले. पारंपरिक वारली चित्रांच्या सोबत त्यांनी प्राणी, पक्षी, फुलांनाही वारली चित्रकलेच्या साच्यात मोठ्या खुबीने बसविले. या कलेने प्रभावित झाल्यानंतर मशे यांचा 1976 साली राष्ट्रपती पुरस्काराने सन्मान झाला. त्यानंतर देशातल्या अनेक कला दालनांमध्ये मशे यांच्या चित्रांची प्रदर्शने भरु लागली.
राज्य सरकारच्या मदतीने वारली चित्रकलेच्या प्रसारासाठी त्यांनी अनेक वर्कशॉप घेतली. आपल्या परिसरातील शेकडो अदिवासी मुलांना वारली कला शिकवून त्यांना स्वत:च्या पायावर उभे केले. मशेंची दोन मुलेही या कलेत पारंगत असून त्यापैकी एक मुलगा वर्षातले तीन महिने जपानच्या म्युझियममध्येच कार्यरत असतो.

बेल्जियमच्या राणीकडूनही बक्षिस 
रशिया, इटली, जर्मनी, जपान, चीन, इंग्लंड, बेल्जियम अशा अनेक देशांनी मशे यांना आपली कलाकुसर दाखविण्यासाठी निमंत्रित केले. बेल्जियमच्या राणीने मशे यांना 17 लाख रुपयांची बक्षिसी दिली. जपानच्या मिथिला म्युझियमचे डायरेक्‍टर होसेगवा यांच्या हस्ते गौरव झाला.

परदेशात असंख्य मानसन्मान मिळत असताना भारत सरकारने मात्र त्यांची भलतीच उपेक्षा केली आहे. 1976 साली तत्कालीन राष्ट्रपती फक्रूद्दिन अली यांनी मशे यांना साडे तीन एकरची जमीन पुरस्कार स्वरुपात देण्याची घोषणा केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button