breaking-newsआंतरराष्टीय

…तर इराणला नष्ट करु, अमेरिकेने दिली धमकी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला आहे. इराणने अमेरिकेच्या हितावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर इराणला नष्ट करु अशी धमकीच ट्रम्प यांनी टि्वटरद्वारे दिली आहे. इराणला लढायचे असेल तर त्यांचा शेवट करु. पुन्हा अमेरिकेला धमकी देण्याची हिंम्मत करु नका असे ट्रम्प यांनी खडसावले आहे.

पुढच्या काही दिवसात अमेरिका आणि इराणमधील तणाव आणखी वाढू शकतो. अमेरिकेने आखाताच्या समुद्रात आपल्या युद्धनौका आणि बी-५२ बॉम्बर विमाने तैनात केली आहेत. इराणचे समर्थन असलेल्या सशस्त्र इराकी गटांकडून धोका असल्यामुळे ट्रम्प प्रशासनाने अनावश्यक राजनैतिक कर्मचारी वर्गाला इराक सोडण्यास सांगितले आहे.

Donald J. Trump

@realDonaldTrump

If Iran wants to fight, that will be the official end of Iran. Never threaten the United States again!

101K people are talking about this

रविवारी बगदादच्या ग्रीन झोन हाऊसिंगमधील सरकारी कार्यालये आणि दूतावासांवर रॉकेट डागण्यात आले. यात अमेरिकन दूतावासाचाही समावेश होता. या हल्ल्यामागे कोण आहे ते अजून स्पष्ट झालेले नाही. डोनाल्ड ट्रम्प यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोलटॉन हे इराण विरोधात कठोर भूमिका घेण्याच्या मताचे आहेत तर प्रशासनातील अन्य व्यक्ती त्या विरोधात आहेत.

मागच्याच आठवडयात संयुक्त अरब अमिरातीच्या समुद्री क्षेत्रात सौदी अरेबियाच्या दोन तेल टँकरवर घातपाताच्या इराद्याने हल्ला करण्यात आला. आधीच या भागात अमेरिका आणि इराणच्या बिघडलेल्या संबंधांमुळे तणाव असताना या घटनेमुळे हा तणाव आणखी वाढला आहे. इराणने या हल्ल्याच्या चौकशीची मागणी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button