breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“…जाहीरपणे सांगण्यासारखं नाही,” उद्धव ठाकरे आणि दरेकरांमध्ये बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुंबई |

विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या या भेटीत उद्धव ठाकरे आणि प्रवीण दरेकरांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. पूरग्रस्तांसाठी मदतीचा चेक देण्यासाठी पोहोचलेल्या प्रवीण दरेकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा सुरु होती. यामुळे दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली यासंबंधी चर्चा सुरु आहे.

दरम्यान भेटीनंतर प्रवीण दरेकर यांन एबीपी माझाशी बोलताना या चर्चा जाहीरपणे सांगू शकत नाही असं म्हटलं आहे. भेटीसंबंधी बोलताना ते म्हणाले की, ‘प्रामुख्याने महाराष्ट्रात आलेली पूरस्थिती आणि अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. त्याचबरोबर पूरग्रस्तांना मुंबईकरांकडून मदत जावी यासाठी मुंबईतील सहकारी संस्थांच्या वतीने दीड कोटींचा निधी मुख्यमंत्री सहायत्ता निधीला आम्ही दिला आहे. मुंबई सहकारात काम करणाऱ्या सहकाऱ्यांचं पूरग्रस्तांसाठी योगदान आहे हे निधीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं”. यावेळी त्यांना बंद दाराआड झालेल्या चर्चेसंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “मी विरोधी पक्षनेता असल्याने मुख्यमंत्री भेटल्यावर स्वावाभिकपणे इतरही राजकीय गोष्टींवर चर्चा होणार. त्याच्यामुळे या चर्चा जाहीरपणे सांगण्यासारख्या नाहीत. अर्धा तास आमची वैयक्तिक भेट झाली”.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button